आता तुमच्या आवडीनुसार चॅनल पाहा आणि फक्त त्याचेच पैसे द्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : आता आपल्या आवडीनुसार टीव्ही चॅनल निवडता येणार आहे आणि त्यासाठी आपण पाहिलेल्या चॅनलचे फक्त पैसे देता येणार आहे. नुकतेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सर्व मल्टी-सर्व्हिस ऑपरेटर (MSOs) आणि लोकल केबल ऑपरेटर्स (LCOs) ला 29 डिसेंबपासून नवीन टॅरिफ पद्धत सुरु करण्याचे आदेश दिले आहे. ट्रायच्या या निर्णायाने नक्कीच ग्राहक वर्गात आनंदाचे […]

आता तुमच्या आवडीनुसार चॅनल पाहा आणि फक्त त्याचेच पैसे द्या
Follow us on

मुंबई : आता आपल्या आवडीनुसार टीव्ही चॅनल निवडता येणार आहे आणि त्यासाठी आपण पाहिलेल्या चॅनलचे फक्त पैसे देता येणार आहे. नुकतेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सर्व मल्टी-सर्व्हिस ऑपरेटर (MSOs) आणि लोकल केबल ऑपरेटर्स (LCOs) ला 29 डिसेंबपासून नवीन टॅरिफ पद्धत सुरु करण्याचे आदेश दिले आहे. ट्रायच्या या निर्णायाने नक्कीच ग्राहक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

टीव्ही 9 मराठीफ्री टू एअर चॅनल आहे. हे चॅनल तुम्ही मोफत पाहू शकता. विविध कंपन्यांच्या डिशच्या माध्यमातून या क्रमांकावर तुम्ही हे चॅनल पाहू शकता.

काय आहे नवीन पद्धत?

ट्रायने सांगितले आहे की, ग्राहकांवर आपण विशिष्ट कोणते टीव्ही चॅनल पाहण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही. ग्राहकांना आता त्यांच्या आवडीनुसार चॅनल पाहण्याचे स्वातंत्र दिले आहे. मात्र यामध्ये ग्राहकांना त्यांनी निवडलेले टीव्ही चॅनल फक्त पाहता येणार आहे आणि ज्या चॅनलचे पैसे ग्राहकांनी दिलेले असतील. तसेच सर्व चॅनल्स वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहेत.  इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड (EPG) द्वारे टीव्हीवर प्रत्येक चॅनलची किंमत दिसेल. कोणताही डिस्ट्रीब्यूटर ब्रॉडकास्टकडून ठरवलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाही.

प्रत्येक महिन्याला खर्च किती?

ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 100 चॅनलसाठी 130 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही 100 पेक्षा अधिक चॅनल बघत असाल तर नंतरच्या 25 चॅनेलसाठी अतिरिक्त 20 रुपये घेतले जातील. याशिवाय तुम्ही जो चॅनल निवडणार त्याची किंमत तुमच्या बीलमध्ये जोडली जाईल. TRAI च्या नुसार चॅनलची किंमत ही 1 ते 19 रुपयांमध्ये असेल.

मोफत चॅनलही मिळणार

TRAI ने सर्व सेवा प्रदान करणाऱ्यांना सुचना दिली आहे की, ग्राहकांना फ्री टु एअर (FTA) चॅनेल पूर्णपणे मोफत दाखवावे लागतील. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही पैस आकारायचे नाही. मात्र सर्व FTA चॅनेल देणे अनिवार्य नसून ते ग्राहकांवर अवलंबून आहे त्याना कोणते चॅनल पाहिजे आहेत. मात्र दुरदर्शनचे सर्व चॅनल्स दाखवणे अनिवार्य असेल.