बँकॉक : थायलँडचे राजा महा पवजिरालोंगकोर्न (Maha Vajiralongkorn) यांची गर्लफ्रेंड सीनीत वोंगवजिरापकडी (Cinit Wongvajirapakdi) यांचे तब्बल 1 हजार फोटो लीक झाल्याचा प्रकार घडला आहे. thetimes.co.uk यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, यातील शेकडो फोटो हे न्यूड आहेत. राजाची पत्नी सुथिडा आणि गर्लफ्रेंड सीनीत यांच्यात गेल्या कित्येक काळापासून भांडणं सुरु असल्याची चर्चा आहे. याच भांडणातून पत्नी सुथिडानं हे फोटो लीक केल्याचं बोललं जात आहे. सुथिडा या सध्या थाडलँडची राणी आहेत. (nude photo of Thailand kings girlfriend has been leaked)
सीनीत हीला थायलँडचे राजा महा पवजिरालोंगकोर्न यांची गर्लफ्रेंड म्हटलं जातं. त्यांच्यातील नातं जगजाहीर आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सीनीतला अचानक गजाआड करण्यात आलं. तिच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करण्यात आला. त्यानंतर त्या कित्येक दिवस कारागृहात बंद होत्या. मात्र, आता सीनीत यांना मुक्त करण्यात आलं आहे. मात्र, कारागृहातून बाहेर येताच सीनीत यांचे हजारो फोटो लीक झाले आहेत.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सीनीत यांचे सगळे न्यूड फोटो हे एका आंदोलनकर्त्याला पाठवण्यात आले. थायलंडमधील राजेशाहीविरोधात सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर हे फोटो पाठवण्यात आल्याचं बोललं जात आहे. हे सगळे फोटो 2012 ते 2014 दरम्यान खुद्द सीनीत यांनीच काढले असल्याची माहिती आहे. तसेच, सध्या थायलंडच्या राजेशाहीविरोधात ब्रिटीश पत्राकर मॅकग्रेगर मार्शल यांनी आवाज उठवला आहे. यांनाही सीनीत यांचे फोटो पाठवण्यात आले आहेत.
थायलंडच्या राजाचं वय सध्या 68 वर्ष आहे, ज्यांनी 2019 मध्ये सुथिडा यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर सुथिडा यांना राणीचा दर्जा मिळाला. राजानं याआधी 3 लग्न केलेली आहेत, आणि त्याला 7 मुलं आहेत. मात्र, मागील 3 बायकांसोबत त्यांनी घटस्फोट घेतला आहे.
राजाची पत्नी सुथिडा ही 42 वर्षांची आहे, तर गर्लफ्रेंड 35 वर्षांची आहे. या दोघीही राजाच्या महालात सिनीअर अधिकारी म्हणून काम करत होत्या. तिथंच राजा त्यांच्या प्रेमात पडला. सुथिडा याआधी थाय एअरवेजमध्ये फ्लाईट क्रू म्हणून काम करत होत्या, तर सीनीत हा थायलंडच्या सैन्यात नर्स म्हणून काम करत होत्या.
दरम्यान, राजाच्या गर्लफ्रेंडचेच फोटो लीक झाल्यामुळे थायलंडमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे. हे फोटो थायलंडच्या राणीने लीक केल्याचे म्हटले जात आहे.
संबधित बातम्या :
कोरोनाकाळात बेरोजगारीची कुऱ्हाड, भारतीय तरुणाला दुबईत सात कोटींची लॉटरी
जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याच्या कंपनीतून हिरे लंपास; नीरव मोदीच्या भावाचा न्यूयॉर्कमध्ये फ्रॉड
(nude photo of Thailand kings girlfriend has been leaked)