चंद्रपूर : चंद्रपुरात एका परिचारिकेला कोरोनाची लागण (Nurse Infected By Corona) झाली आहे. ही परिचारिका मुंबईहून चंद्रपूरला तिच्या घरी परतली होती. मुंबईच्या नामांकित रुग्णालयात काम केलेल्यानंतर ही परिचारिका 22 दिवस क्वारंटाईनमध्ये होती. त्यानंतर ती तिच्या घरी चंद्रपूरला परतली. मात्र, इथे तिला कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने तिने स्वत: रुग्णालय गाठलं. त्यानंतर तिचा (Nurse Infected By Corona) कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. आज सकाळी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाने जारी केलेल्या ताज्या अहवालात चंद्रपूरकर परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.
कोरोनाबाधित परिचारिका मुंबईतील नामांकित रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होती. आपले कर्तव्य बजावल्यानंतर ती मुंबईतील हॉटेलमध्ये 22 दिवस क्वारंटाईन होती. त्यानंतर 16 मे रोजी ती चंद्रपुरात तिच्या घरी आली. तिथे होम क्वारंटाईन असताना 20 मे रोजी तिला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. तिने तात्काळ रुग्णालय गाठलं. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केल्यावर तिला उपचारार्थ दाखल करुन घेण्यात आले. तिच्या स्वॅब टेस्टचा अहवाल आज (23 मे) पॉझिटिव्ह (Nurse Infected By Corona) आला.
फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह, कळंब रुग्णालयाचा कारभारhttps://t.co/62ZrWQhYZa
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 23, 2020
परिचारिका राहत असलेला परिसर सील
परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह येताच ती राहत असलेला बाबुपेठ परिसरातील गाडगेबाबा चौकाचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा भाग पूर्णत: सील करण्यात येणार असून पोलीस, मनपा, आरोग्य आणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी या भागाचा दौरा करत व्यवस्थेची आखणी केली. पुढील 14 दिवस या भागात कुणालाही प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.
या भागातील नागरिकांच्या अत्यावश्यक सुविधांसाठी मनपा प्रशासन पुढाकार घेणार असून युवतीच्या घरच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमुने आज घेतले जाणार आहेत. जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांना क्वारंटाईन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या उदाहरणाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला या बाबतीत सहकार्य करण्याचे (Nurse Infected By Corona) आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात डॉक्टरचा ‘कोरोना’मुळे मृत्यू
पुण्यात धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
मुंबई ते वर्धा पायपीट, गावी परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह
लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन व्यवहारात वाढ, एप्रिल महिन्यात शंभर कोटींचा व्यवहार