अजित पवारांनी राजीनामा द्यावा; ओबीसींना वाऱ्यावर सोडल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप

| Updated on: Nov 05, 2020 | 4:12 PM

अजित पवारांनी राजीनामा द्यावा," अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. (OBC leader Prakash shendge Press Conference)

अजित पवारांनी राजीनामा द्यावा; ओबीसींना वाऱ्यावर सोडल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप
ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण नको
Follow us on

मुंबई : “राज्य मंत्रिमंडळाच्या तीन बैठका झाल्या आहे. त्यातील एका बैठकीतही निर्णय घेतला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. (OBC leader Prakash shendge Press Conference)

“अजित पवारांनी अद्याप काय केलं? सरकारी खजिना फक्त मराठा समाजासाठी वापरला जात आहे. त्यांनी एका रात्री 8 कोटी रुपये पास केले आणि ओबीसीबाबत मात्र दुजाभाव केला. त्यामुळे आम्ही तुमचा राजीनामा मागितला तर काही वावगं ठरणार नाही,” असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

“राज्यातील ओबीसी समाज पहिल्यांदा एकवटला आहे. त्यामुळे त्यांची ताकद उभ्या देशाने पाहिली आहे. 21 जुलै, 9 ऑक्टोबरला कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहोत. मराठा समाजासाठी अनेक निर्णय होत आहेत. मात्र आमच्यासाठी होत नाही,” असा आरोप प्रकाश शेंडगेंनी केला.

“यामुळे येत्या 10 नोव्हेंबरला 200 ओबीसी नेत्यांची गोलमेज परिषद पहिल्यांदा मुंबईत आयोजित केली आहे. ही गोलमेज परिषद सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत होणार आहे. यासाठी सर्व नेते एकत्र काम करत आहेत. या गोलमेज परिषदेत मोठी घोषणा केली जाईल,” असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले.

“जर शासनाने ओबीसींची दखल घेतली नाही, तर रणनीती ठरवली जाईल. मेगाभरती, अकरावी आणि बारावी प्रवेश प्रक्रियेसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. मराठा समाजाच्या जागा सोडून उर्वरित 87 जागा भराव्यात अशी मागणीही शेंडगेंनी केली.”

“काही मराठा समाजाचे नेते सुप्रीम कोर्टात गेले आहेत. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचं ते सांगतात, ही बाब बेकायदेशीर आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण खेचण्याचं काम मराठा समाज करत आहे. बाळासाहेब सराटे यांनी जी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली ती मागे घ्यावी, अन्यथा येत्या काळात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अटळ आहे,” असेही प्रकाश शेंडगे म्हणाले. (OBC leader Prakash shendge Press Conference)

संबंधित बातम्या : 

विदर्भात थंडीचा कडाका, गेल्या 24 तासात तापमानात घसरण, रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद

“दार उघड उद्धवा, दार उघड!”, तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या