मुंबई : धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद आणि (One More Case Filed Against Kshitij Prasad) अॅगिसिलोस डेमेट्रियड्स यांच्या विरोधात नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकेन प्रकरणात हा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (One More Case Filed Against Kshitij Prasad).
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी एका दक्षिण आफ्रिकन नागरिकाला अटक केली होती. त्याचं नाव गॅब्रिअल आहे. याच्या चौकशीत क्षितीज प्रसाद आणि अॅगिसिलोस डेमेट्रियड्स याचं नाव समोर आलं. यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी क्षितीज प्रसाद आणि अॅगिसिलोस डेमेट्रियड्स याला पुन्हा जेलमधून ताब्यात घेतलं आहे.
क्षितीज प्रसाद हा धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी दिग्दर्शक आहे. त्याला 24 सप्टेंबर रोजी समन्स बजावण्यात आला होता. एनसीबीने हे समन्स त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी बजावलं होतं. यानंतर क्षितीज यांच्या घरी 25 सप्टेंबर रोजी धाड टाकण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी क्षितीजला एनसीबी कार्यलयात बोलावलं होतं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. क्षितीज प्रसाद याला 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून क्षितीज तुरुंगात आहे.
क्षितीज प्रसादच्या घरी ड्रग्स सापडले होते. क्षितीज प्रसादने जामिनासाठी अर्ज ही केला आहे. त्यावर उद्या निकाल दिला जाणार आहे. मात्र, त्या आधीच क्षितीज प्रसादविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, काल बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून चौकशी झाली. इतके दिवस सगळ्यांपासून लपण्याचा प्रयत्न करणारी करिश्मा (Karishma Prakash) अखेर एनसीबीसमोर हजर झाली.
करिश्मा प्रकाश दीपिका पादुकोणची मॅनेजर होती. ती क्वान कंपनीच्या वतीने दीपिकाचे काम सांभाळत होती. एनसीबीने अलीकडेच तिच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ती पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आली.
Drugs Connection | ‘फरार’ करिश्मा एनसीबीसमोर हजर, ड्रग्ज प्रकरणी चौकशीला सुरुवात!https://t.co/fUcAzF2k0V#KarishmaPrakash #DrugCase
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2020
One More Case Filed Against Kshitij Prasad
संबंधित बातम्या :