Karachi plane crash | पाकिस्तानात 100 प्रवाशांसह विमान इमारतीवर कोसळलं

| Updated on: May 22, 2020 | 4:19 PM

पाकिस्तानात तब्बल 100 प्रवाशांसह विमान कोसळून भीषण दुर्घटना (Pakistan Karachi plane crash) घडली.

Karachi plane crash | पाकिस्तानात 100 प्रवाशांसह विमान इमारतीवर कोसळलं
Follow us on

कराची : पाकिस्तानात तब्बल 100 प्रवाशांसह विमान कोसळून भीषण दुर्घटना (Pakistan Karachi plane crash) घडली. धक्कादायक म्हणजे हे विमान रहिवासी भागात एका इमारतीवर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. हे विमान लाहोरवरुन कराचीला जात होतं. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. (Pakistan Karachi plane crash)

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं हे विमान होतं. पाकिस्तानी मीडियानुसार, ही दुर्घटना कराची विमानतळाजवळ घडली. ज्यावेळी विमान उतरण्याच्या तयारीत होतं, त्यावेळीच ही दुर्घटना घडली. या विमानात 97 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स होते असं सांगण्यात येत आहे.

स्थानिक प्रशासनासह मदत आणि बचावकार्यासाठी आर्मी क्विक रिएक्शन फोर्स आणि सिंध पाकिस्तान रेंजर्स घटनास्थळी पोहोचले. विमान अपघातामुळे आरोग्य मंत्र्यांनी कराचीच्या सर्व मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन आणीबाणी जाहीर केली आहे

कराची विमानतळाजवळील निवासी भागात विमान कोसळल्याने घबराट पसरली. विमान कोसळले, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले.

पीआयएच्या (PIA) विमानाचे आधीही अपघात

गेल्या वर्षी गिलगिट विमानतळावर उतरताना पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे विमान धावपट्टीवरुन घसरून अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने प्रवासी सुखरुप होते, परंतु विमानाचे मोठे नुकसान झाले होते.

सात डिसेंबर 2016 रोजी चित्रालहून इस्लामाबादला जाणारे पीआयएचे विमान 48 प्रवासी आणि केबिन क्रसह कोसळले होते. या दुर्दैवी अपघातातून एकही जण बचावला नव्हता.