POK भारताचा भाग होता, आहे आणि राहील; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले

| Updated on: Nov 04, 2020 | 10:17 PM

भारतीय संसदेत पाकव्याप्त काश्मीर POK भारताचा हिस्सा असल्याचा ठराव मंजूर झाला आहे, याची आठवण राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला करुन दिली. | Rajnath Singh

POK भारताचा भाग होता, आहे आणि राहील; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले
Follow us on

पाटणा: पाकव्याप्त काश्मीर (POK) हा भारताचा भाग होता, आहे आणि भविष्यातही राहील. पाकिस्तानने ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले. भारतीय संसदेत पाकव्याप्त काश्मीर POK भारताचा हिस्सा असल्याचा ठराव मंजूर झाला आहे, याची आठवण राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला करुन दिली. (Rajnath Singh slams Pakistan over POK)

बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी राजनाथ सिंह हे बुधवारी मुझफ्फुरपुरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तान आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. भारत-चीन सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावासंदर्भात राहुल गांधी वाट्टेल ती वक्तव्ये करतात. चीनने भारताची जमीन बळकावली, असे ते म्हणतात. पण 1962 पासून 2013 पर्यंत काय झाले, याचा खुलासा मी केला तर तुम्हाला लोकांना चेहरा दाखवणे अवघड होऊन बसेल, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.


तर बाल्टिस्टानवर दावा सांगणाऱ्या पाकिस्तानलाही राजनाथ सिंह यांनी फटकारले. पाकिस्तानने बाल्टिस्टानमधील कारवाया थांबवाव्यात. पीओकेमध्ये कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही. पाकव्याप्त काश्मीर हा भारताच भाग असल्याची जाणीव पाकिस्तानने कायम ठेवावी, असे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यानी गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. तसेच या प्रांतात निवडणुका घेण्यात तयारी इम्रान खान सरकार करत आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारताकडून तीव्र निषेध करण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांसाठी NDA चं जेवढं काम, तेवढं आतापर्यंत कुणाचंच नाही, पंतप्रधान मोदींचा दावा

ईव्हीएम नव्हे या तर ‘मोदी व्होटिंग मशिन्स’; राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा

बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की

(Rajnath Singh slams Pakistan over POK)