कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चारही बाजूंनी पंढरपूरची नाकाबंदी!

| Updated on: Nov 25, 2020 | 9:59 AM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चारही बाजूंनी पंढरपूरची नाकाबंदी!
Follow us on

पंढरपूर: कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये चारही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या 9 गावामध्ये ही नाकाबंदी असणार आहे. कार्तिकी यात्रा गावोगावी साजरा करण्याचं सोलापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा मानस आहे. अन्य जिल्ह्यातील भाविक, वारकरी पंढरपुरात येऊ नये यासाठी पंढपूर शहरात अठराशे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.(No entry into Pandharpur for kartiki ekadashi on the background of Corona)

25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रखुमाईचं मुखदर्शन बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर आणि लगतच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचं सध्या सुरु करण्यात आलेलं मुखदर्शनही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीनं घेण्यात आला आहे. मात्र, देवाचे नित्योपचार परंपरेनुसार केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील 6 विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे. 23 आणि 24 नोव्हेंबरला विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन सुरु असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्थाही सुरु आहे. तर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान बंद असलेलं मुखदर्शन पुन्हा 28 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीनं दिली आहे.

कार्तिकी एकादशीला अजितदादा पंढरपूरला जाणार

कार्तिकी एकादशीला राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येत नसेल तर मग उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते होणारी पूजाही रद्द करावी, असा सूर उमटू लागला आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं आज स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं, पण…

PHOTO | कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

कार्तिकी एकादशीनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

No entry into Pandharpur for kartiki ekadashi on the background of Corona