Corona Death India | देशात ‘कोरोना’चा चौथा बळी, पंजाबमध्ये एकाचा मृत्यू

| Updated on: Mar 19, 2020 | 5:27 PM

देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर पोहोचला (Corona Death India) आहे. आज (19 मार्च) पंजाबमध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Corona Death India | देशात कोरोनाचा चौथा बळी, पंजाबमध्ये एकाचा मृत्यू
Follow us on

चंदीगढ : देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर पोहोचला (Corona Death India) आहे. आज (19 मार्च) पंजाबमध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची (Corona Death India) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे. तर चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब सरकारच्या आदेशानुसार, उद्या (20 मार्च) रात्री 12 पासून सर्व सरकारी आणि खाजगी बस वाहतूक बंद ठेवली जाणार आहेत. त्याशिवाय उद्यापासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून 20 पेक्षा अधिक लोक एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाही. त्याशिवाय लग्न सभारंभ, हॉटेल, जिम, कोचिंग सेंटर, शाळा आणि कॉलेजही बंद ठेवण्यात येणार (Corona Death India) आहे.

देशात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • आंध्रप्रदेश – 1
  • दिल्ली – 12
  • हरियाणा – 17
  • कर्नाटक – 14
  • केरळ – 27
  • महाराष्ट्र – 49
  • ओडिशा -1
  • पुद्दुचेरी – 1
  • पंजाब – 2
  • राजस्थान 7
  • तामिळनाडू – 2
  • तेलंगाणा – 6
  • चंदीगढमधील केंद्रशासित प्रदेश – 1
  • जम्मू -काश्मीरमधील केंद्रशासित प्रदेश – 4
  • लडाख – 8
  • उत्तरप्रदेश -17
  • उत्तराखंड – 1
  • पश्चिम बंगाल – 1

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू