मुलाने विचारले निवडणुकीत तू का हरली? मी त्याला सांगितले…: पंकजा मुंडे

| Updated on: Mar 07, 2020 | 7:56 PM

भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आता यावर स्वतः पंकजा मुंडे यांनीच उत्तर दिलं आहे.

मुलाने विचारले निवडणुकीत तू का हरली? मी त्याला सांगितले…: पंकजा मुंडे
Follow us on

पुणे : भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. यानंतर अनेकांना त्यांचा पराभव का झाला असा प्रश्न पडला. आता यावर स्वतः पंकजा मुंडे यांनीच उत्तर दिलं आहे (Pankaja Munde on defeat in Assembly Election). पंकजा मुंडे यांना त्यांच्या मुलाने निवडणुकीत का जिंकली नाहीस? असा प्रश्न विचारल्याची आठवण सांगितली. तसेच यावर आपण अभ्यास केला, मात्र पेपर दुसऱ्यांनीच तपासल्याचं उत्तर दिल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय पदवी ग्रहण समारंभात बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या मुलानं विचारलं, आई तु इतकी चांगली आहेस, मग तू जिंकली का नाही? मी सांगितलं जसा तुझा पेपर तु लिहितो म्हणून तुला सांगता येतं की मला इतके मार्क आहेत. आमच्याकडे मी अभ्यास करते, पेपर दुसरेच लिहित असतात. त्यामुळे असं होऊ शकतं. यानंतर मला लोकांनी विचारलं तुम्ही काय करता? मी सांगितलं एखाद्या पायाला फ्रॅक्चर झाली की माणूस कसा आराम करतो आणि त्याचे मित्र येऊन त्यावर सह्या करतात तसं माझं सध्या चाललं आहे. मी फ्रॅक्चर झाले आहे. करिअर खोडं फार फ्रॅक्चर होऊ शकतं. ते फार जिव्हारी लावून घ्यायचं नसतं. तोही एक अनुभव असतो.”

मला या कार्यक्रमाला का बोलावलं या मी विचार केला त्यावर मेरिटचं शिक्षण घेऊन देखील बेरोजगार असल्यास काय भावना असते हे मी समजून घेऊ शकेल म्हणून मला बोलावलं असेल असं वाटलं. मी 23 हजार गावांना पाणी पाजलं. एवढ्या मुलींचा जन्मदर वाढवण्यात योगदान दिलं. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन केल्या. ग्रामपंचायतींसाठी काम केलं. जलयुक्त शिवार केलं. सगळं चांगलं केलं. पण अखेर मी निवडणुकीत जिंकू शकले नाही. हा भाग माझा परिचय करुन देताना राहिला, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“या जगात आता फक्त शोलेतला ठाकूर ‘सेफ’ राहू शकतो”

आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी कोरोनावर भाष्य करताना एका विनोदाचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “बऱ्याच दिवसांनी माईक समोर उभी आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक कार्यक्रम रद्द होत आहेत. या जगात आता फक्त शोलेतला ठाकूर सेफ राहू शकतो. कारण तो सेक हॅन्ड करू शकत नाही.”

Pankaja Munde on defeat in Assembly Election