पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची अचानकपणे बदली (Panvel commissioner Ganesh Deshmukh transferred) करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ही बदली करण्यात आली असून गणेश देशमुख यांच्या जागी उल्हासनगरचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Panvel commissioner Ganesh Deshmukh transferred)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल करण्यात आले होते. मुंबई परिसरातील अन्य महापालिकेत सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यांचा ठपका संबंधित महापालिका आयुक्तांवर ठेवले जात असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची आता पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन महिन्यापूर्वी पनवेल आयुक्त गणेश देशमुख यांनी क्वारंन्टाईन शिक्के असलेल्यांच्या घरी धाडी टाकल्या होत्या. कोरोना संशयित क्वारन्टाईन करण्याऱ्या सदस्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, खुद्द पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख पोलिसांच्या मदतीने क्वारन्टाईन असणाऱ्या व्यक्तींच्या घरात जाऊन झडती घेण्याचे कार्य करत होते. पोलिसांना घेऊन मनपा आयुक्तांनी घरातील सदस्यांना अचानक भेट दिली होती, पण सदस्यच घरी नसल्याने मोठा गोंधळ झाला होता. या तिन्ही दोषी सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी त्यावेळी सांगितले होते.
मुंबई महापालिका आयुक्तांची बदली
काही दिवसापूर्वी म्हणजे 8 मे रोजी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (BMC commissioner Praveen Pardeshi transferred) आलं होतं. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली करुन त्यांच्या जागी इक्बालसिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं
नवी मुंबईत आयुक्तांची अचानक भेट, ‘होम क्वारन्टाईन’ सदस्य घरी नसल्याने खळबळ