Anurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी

| Updated on: Oct 02, 2020 | 4:31 PM

अनुराग कश्यपने चौकशीदरम्यान चुकीची माहिती दिल्याचं पायल घोषचं म्हणणं आहे. त्यामुळे तिने अनुराग कश्यपच्या नार्को चाचणी व्हावी, अशी मागणी तिने केली आहे

Anurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी
Follow us on

मुंबई : अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे (Payal Ghosh Demand For Anurag Kashyaps Narco Test) गंभीर आरोप लावल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुरुवारी त्याची तब्बल 8 तास चौकशी केली. मात्र, अनुराग कश्यपने चौकशीदरम्यान चुकीची माहिती दिल्याचं पायल घोषचं म्हणणं आहे. त्यामुळे अनुराग कश्यपच्या नार्को चाचणी व्हावी, अशी मागणी तिने केली आहे (Payal Ghosh Demand For Anurag Kashyaps Narco Test).

याबाबत तिने ट्वीट केलं, “मिस्टर कश्यप चौकशीदरम्यान खोटं बोलले. माझे वकील एक याचिका दाखल करणार आहेत, यामध्ये त्यांची नार्को टेस्ट, लाय डिटेक्टर आणि पॉलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी केली जाणार आहे, जेणेकरुन खरं समोर येऊ शकेल”.

अनुराग कश्यपकडून आरोपांचं खंडण

अनुराग कश्यपची गुरुवारी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये आठ तास चौकशी झाली. चौकशीदरम्यान त्याने त्याच्यावर लावण्यात आलेल्या बलात्कार आणि इतर सर्व आरोपांचं खंडण केलं. त्याशिवाय, गेल्या अनेक काळापासून त्याचं पायलशी बोलणंही झालं नसल्याचं त्याने सांगितलं (Payal Ghosh Demand For Anurag Kashyaps Narco Test).

अनुराग गुरुवारी सकाळी दोघांसोबत पोलीस स्टेशनला पोहोचला. या आठ तासांच्या चौकशीत त्याने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. अनुरागने पोलिसांना सांगितलं की, “पायल घोषला मी फक्त प्रोफेशनली ओळखतो”. तसेच, गेल्या अनेक काळापासून तो पायला भेटलाही नाही आणि त्यांच्यात काही बोलणंही झालं नाही, असंही त्याने सांगितलं.

अनुरागच्या वकीलाचं वक्तव्य

अनुराग कश्यपची वकील प्रियांका खिमानीचं वक्तव्यही समोर आलं आहे. प्रियांकानुसार, अनुराग कश्यपने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडण केलं आहे आणि पोलिसांना त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे. त्यांनी दिलेले पुरावे त्यांच्या समर्थनात आहे. त्यामुळे पायल घोषची तक्रार खोटी असल्याचं सिद्ध होईल. कश्यपांनी पोलिसांना कागदी पुरावेही दिले आहेत की, ते 2013 मध्ये सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रीलंकेला गेले नव्हते. हे खोटं आहे. अशी कुठलीही घटना कधी घडली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अनुराग कश्यप त्यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आणि चुकीच्या आरोपांमुळे दु:खी आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना त्रास झाला आहे. त्यामुळे त्यांनी पायल घोष विरोधात कायद्याचा दुरुपयोग करण्यासाठी आणि चुकीच्या उद्धिष्टांसाठी मी टू मोहीमेला हायजॅक करण्यासाठी तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्याय मिळेल आसा त्यांना विश्वास आहे.

Payal Ghosh Demand For Anurag Kashyaps Narco Test

संबंधित बातम्या :

Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी होणार, पायल घोष प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स