मुंबई : अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag kashyap) अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने (Payal Ghosh) मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज (28 सप्टेंबर) पायल घोषची भेट घेतली. या भेटीनंतर या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली असून, या परिषदेमध्ये रामदास आठवलेंनी पायल घोषची बाजू मांडताना मुंबई पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे (Payal ghosh Ramdas Athawale PC on Anurag molestation case).
तसेच, पायल घोष प्रकरणात आता मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून, या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे, या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘अभिनेत्री पायल घोषसोबत मी अर्धातास चर्चा केली. काहीवर्षांपूर्वी पायलवर अनुराग कश्यप यांनी अत्याचार केला आहे. या प्रकरणी मी, विश्वास नांगरे पाटील, अभिषेक त्रिमुखे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगितले आहे. आमचा पोलिसांच्या चौकशीवर विश्वास आहे, मात्र एवढा उशीर लागत असताना कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे.’
अनुराग कश्यप मुंबईतच आहेत. तरीही त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेले नाही. पायलला आपल्या जिवाची भिती आहे. तिने पोलिस संरक्षण मागितले आहे. याबाबत मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणार आहे. मात्र, पायलचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची असेल. आम्ही तपासासाठी आठ दिवसांचा वेळ देतोय. जर योग्य दिशेने कारवाई झाली नाही, तर आम्ही आंदोलन करु. एक-दोन दिवसात आमचे एक डेप्युटेशन अनिल देशमुख यांनाही भेटणार आहे,’ असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.(Payal ghosh Ramdas Athawale PC on Anurag molestation case)
यावेळी पायल घोष म्हणाली, ‘माझ्यासोबत काय झाले, ते मी सांगितले आहे. मला पुन्हापुन्हा सांगणे योग्य वाटत नाही. माझ्यासोबत जे झाले ते कुणासोबतही होवू नये. ज्यांच्यासोबत असे काही झाले आहे, त्यांनी न भीता पुढे यावे. मी रामदास आठवले आणि सर्वांची आभारी आहे.
पीडित अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अनुरागने माझ्यासोबत अतिप्रसंग केला असून तो माझ्याशी अतिशय वाईट वागला, असे तिने आपल्या आरोपात म्हटले आहे. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.
(Payal ghosh Ramdas Athawale PC on Anurag molestation case)
VIDEO : योग्य कारवाई न केल्यास आंदोलनं करु, रामदास आठवले-पायल घोषची पत्रकार परिषदhttps://t.co/pzrBQtHD7l
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2020
संबंधित बातम्या :
‘अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही’, कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्युत्तर
#Metooच्या आरोपानंतर राधिका, तापसीचा अनुराग कश्यपला पाठिंबा
Anurag Kashyap | अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलिसात गुन्हा, अटकेची टांगती तलवार