पुणे : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मुदत वाढ करतानाच सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आता मद्यविक्रीवरील निर्बंधही कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातही मद्यविक्री आणि निर्मितीस मंजुरी दिली आहे (Permission to Alcohol and wine shop in pune ). असं असलं तरी यातून कंटेनमेंट झोनला वगळण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मनपाच्या भागात मद्यविक्रीवर निर्बंध असणार आहेत.
उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मद्यनिर्मिती आणि विक्रीला मंजुरी दिली आहे. पुणे शहरात प्रतिबंधित क्षेत्रात मद्यविक्री होणार नाही. संध्याकाळी 6 नंतर मद्यविक्रीवर सर्व ठिकाणी पूर्णपणे बंदी असणार आहे. घाऊक विक्रेत्यांना 50 टक्के कर्मचारीच ठेवण्यास परवानगी आहे. मद्यविक्रीत केवळ सीलबंद मद्याच्या विक्रीलाच मंजुरी देण्यात आली आहे. महापालिका, नगरपरिषद क्षेत्रात मद्यविक्रीस बंदी आहे. एकावेळी दुकानासमोर फक्त 5 ग्राहक असण्याचीही अट ठेवण्यात आली आहे. तसेच दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचं अंतर असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दुकानं व परिसर दर 2 तासांनी निर्जंतुक करण्याच्या सक्त सुचनाही मद्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनचे नियम पाळण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदाराची असणार आहे. दुकानांमध्ये मद्यप्राशन करण्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
मद्य निर्मिती आणि विक्रीबाबत:
दरम्यान, लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली. रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशा तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सांगितले. मात्र पुणे शहरातील कंटेनमेंट क्षेत्रात मद्य विक्रीची दुकानं बंदच राहणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकानं सुरु करण्यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शासन आदेश काढला आहे. यात मद्यविक्री आणि निर्मितीसाठी लागू करण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचीही माहिती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
मद्यप्रेमींना दिलासा, महाराष्ट्रात ‘रेड झोन’मध्येही दारु विक्रीला सशर्त परवानगी
महाराष्ट्रात दारुची दुकानं उघडणार, पण नियम काय?
संबंधित व्हिडीओ :