पुणे : कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत (Petrol price hike) आहेत. पुण्यातील पेट्रोलचा दर 82.43 रुपयांवर तर मुंबईत 82.70 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत वाहनचालक हैराण झाले आहेत. राज्यातील इतर भागातही पेट्रोल दरात वाढ झाली (Petrol price hike)आहे.
डिझेलच्या दरातही गेल्या आठ दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. आज मुंबईत झिझेलचा दर 72.64 आहे. तर पुण्यात डिझेलचा दर 71.33 एवढा आहे. राज्याच्या इतर भागातही डिझेल दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.
संचारबंदीच्या काळात पुण्यात केवळ अत्यावश्यक वाहतूक सेवा सुरू होती. 3 जूननंतर शहरातील व्यवहार सुरू झाले. मात्र, त्याचवेळी वाढत गेलेल्या इंधन दरवाढीचा फटका पुणेकरांना बसला आहे.
साधारण स्थितीत पुण्यात रोज 30 लाख लिटर पेट्रोल विक्री होते. लॉकडाऊन काळात ती कमी होऊन केवळ 3 लाख लिटरवर आली होती. सध्या रोज किमान 20 ते 22 लाख लिटर विक्री होत आहे.
अशी झाली दरवाढ
7 जून
पेट्रोल 78.67
डिझेल 67.55
8 जून
पेट्रोल 79.25
डिझेल 68.11
9 जून
पेट्रोल 79.77
डिझेल 68.65
10 जून
पेट्रोल 80.15
डिझेल 69.07
11 जून
पेट्रोल 80.73
डिझेल 69.62
12 जून
पेट्रोल 81.27
डिझेल 70.17
13 जून
पेट्रोल 81.84
डिझेल 70.71
14 जून
पेट्रोल 82.43
डिझेल 71.31
संबंधित बातम्या :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील पेट्रोल पंपवर आत्मनिर्भर उपक्रम
पेट्रोल दरात तब्बल 12 रुपयांपर्यंत कपात शक्य, SBI रिसर्च टीमचा दावा