आगामी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी भाजपाची जोरादार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (2 सप्टेंबर) मुंबईत गणेश दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी अमित शाह यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. तसेच लालबागचा राजा येथेही भेट देणार आहेत.
गेल्यावर्षीही अमित शाह यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती.
यावेळी अमित शाह यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सिद्धिविनायक मंदिरात अमित शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी अमित शाह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अमित शाह यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते.