Corona | पिंपरी चिंचवडकरांचा नेटाने लढा, 12 पैकी 9 रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी

| Updated on: Mar 30, 2020 | 3:55 PM

पिंपरी चिंचवड परिसरात 11 मार्चपासून तब्बल 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले (Pimpri Corona patients decrease) होते. त्यातील 9 जण उपचारानंतर घरी परतले.

Corona | पिंपरी चिंचवडकरांचा नेटाने लढा, 12 पैकी 9 रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी
Follow us on

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोना रुग्णांचा संख्येत घट (Pimpri Corona patients decreased) होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड परिसरात 11 मार्चपासून तब्बल 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले (Pimpri Corona patients decreased) होते. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये 12 रुग्णांपैकी 9 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता फक्त 3 रुग्ण हे पिंपरी चिंचवडमधील महापालिका रुग्णालयात उपचार घेत आहेत.

एकीकडे राज्यभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना, पिंपरी चिंचवडसाठी काहीसा दिलासा मिळत आहे.  महत्त्वाचं म्हणजे मागच्या 9 दिवसात पिंपरी-चिंचवडमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये किराणामालाच्या दुकानांबाहेर गर्दीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र पिंपरीच्या रस्त्यांवर अद्यापही तुरळक नागरिक दिसत आहेत.

पोलिसांची कडक कारवाई सुरुच
दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांची रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्य तपासणी सर्व्हेचे काम सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग आणि अग्निशामक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ग्निशमन विभागाच्या वाहनाद्वारे पिंपरी चिंचवडमधील परिसरामध्ये रात्रीच्या वेळी औषधाची फवारणी करण्याचं काम सुरू आहे.

पुण्यात एकाचा मृत्यू 

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Pune First death of corona positive ) आहे. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे, तर महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या 9 वर पोहोचली आहे. (Pune First death of corona positive )

पुण्यात आतापर्यंत 31 कोरोनाचे रुग्ण होते, त्यातील 7 जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आलं तर आज एकाचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण

देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतरही ‘कोरोना’ग्रस्तांचे आकडे वाढतानाच दिसत आहेत. महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 215 वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकमध्ये गेल्या बारा तासात नवे रुग्ण सापडले आहेत. (Rise in Maharashtra Corona Patients)

पुण्यात 5, मुंबईत 3, नागपुरात 2, तर कोल्हापूर-नाशिकमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 26 नवे रुग्ण सापडले आहेत.

संबंधित बातम्या 

Pune Corona | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, पुणेकरांची चिंता वाढली