बुलडाणा : महिला दिनानिमित्ताने बुलडाणा जिल्ह्यात पिंक वूमन असा आगळा-वेगळा उपक्रम जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सुरु केला (Pink Women day week Buldhana) आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सरकारच्या महत्त्वाच्या पदावर एक दिवसांसाठी रुजू केले जात आहे. यामध्येच एका गॅरेज मॅकेनिकलच्या मुलीला थेट बुलडाणा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या जागेवर रुजू करण्यात (Pink Women day week Buldhana) आले आहे.
बुलडाण्याचे पोलीस अधिक्षक यांनी गॅरेज मेकॅनिकल अब्दुल असिफ यांची मुलगी सहरीश कवल हिला जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा सांकेतिक पदभार दिला. या पदाची सांकेतिक पदभार घेताच बुलडाणा पोलीस दलाने एका दिवसाच्या पोलीस अधीक्षकांना मानवंदना दिली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी सांकेतिक पदभार असलेल्या सहरिश कवल या मुलीला ‘सॅल्यूट’ केला.
पोलीस अधिक्षक पदावर रुजू होताच लाल दिव्याच्या गाडीतून एण्ट्री, अख्खे पोलीस दल दिमतीला, शासकीय इतमामत सलामी, जिल्हा पोलीस दलाच्या परिचयानंतर थेट पोलीस अधिक्षकांच्या खुर्चीत हे सर्व पाहून सहरीशचे वडील अब्दुल यांनाही आनंद झाला.
बुलडाण्याचे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडून पदभार घेतला. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. जागतिन महिला दिन 3 दिवसांनी आहे.
एस. पी. सहरिश कवल ही मलकापूर येथील उर्दू हायस्कूल या शाळेतील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी आहे..सहरिशला खुर्चीवर बसल्यावर आनंद तर झालाच शिवाय क्राईम मिटवण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले.
महिला सशक्तीकरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवित असल्याचे बुलडाणा पोलीस अधिक्षक दिलीप पटाील भुजबळ यांनी सांगितले. तर मुलींना प्रशासकीय सेवा समजली पाहिजे आणि त्यांचे मनोबल वाढले पाहिजे या हेतुने हा उपक्रम आहे, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या पिंक वूमन सप्ताहाअंतर्गत चंद्रा यांनी पहिल्या दिवशी पूनम देशमुख या विद्यार्थिनीला जिल्हाधिकारी पदाची सूत्रे दिली. तर हाच कित्ता सीईओ शणमुगराजन यांनी गिरवीला. त्यांनी दोन मुली स्नेहा जाधव आणि कृतिका राऊत या दोन विद्यार्थिनींना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार दिला.