मोदींचा मोठा निर्णय, राम मंदिराबाबत अध्यादेश आणणार नाही!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षातील पहिली मुलाखत दिली. देशातील आघाडीची वृत्तसंस्था एएनआयने मोदींची जवळपास 95 मिनिटे मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदींनी देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं. देशभरात सध्या गाजत असलेल्या राम मंदिराच्या मुद्यावरुनही मोदींना प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत मोदींनी मोठं वक्तव्य केलं. मोदी म्हणाले, “राम मंदिराबाबतच्या अध्यादेशावर कायदेशीर प्रक्रियेनंतरच विचार केला जाईल. सरकार अध्यादेश […]

मोदींचा मोठा निर्णय, राम मंदिराबाबत अध्यादेश आणणार नाही!
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षातील पहिली मुलाखत दिली. देशातील आघाडीची वृत्तसंस्था एएनआयने मोदींची जवळपास 95 मिनिटे मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदींनी देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं. देशभरात सध्या गाजत असलेल्या राम मंदिराच्या मुद्यावरुनही मोदींना प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत मोदींनी मोठं वक्तव्य केलं.

मोदी म्हणाले, “राम मंदिराबाबतच्या अध्यादेशावर कायदेशीर प्रक्रियेनंतरच विचार केला जाईल. सरकार अध्यादेश आणणार नाही. राम मंदिर कायद्यानेच बनेल. सध्या कायदेशीर प्रक्रियेत काँग्रेसने आडमुठी भूमिका घेतली आहे”

मोदींच्या या वक्तव्यानंतर भाजपचे मित्रपक्ष आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष असेल. कारण शिवसेनेने सातत्याने अध्यादेश आणून राम मंदिर उभारा अशी मागणी लावून धरली आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गेल्याच महिन्यात अयोध्या दौरा करुन राम मंदिराची मागणी केली होती. राम मंदिरावरुन शिवसेनेने भाजपला आणि मोदींना सातत्याने कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यादेश आणला जाणार नाही, राम मंदिर कायद्यानेच होईल, असं सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे अयोध्येत काय म्हणाले होते?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्ल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला होता. “पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तुम्ही मंदिर बनवा, मी श्रेय घेणार नाही. फक्त मी रामभक्त म्हणून येईन. आता हिंदू गप्प बसणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

सर्जिकल स्ट्राईक

या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरही भाष्य केलं. उरी हल्ल्याने मला अस्वस्थ केलं होतं. मला प्रचंड राग आला होता. मात्र सर्जिकल स्ट्राईक मोठा धोका होता, त्यामुळे मला जवानांची चिंता अधिक होती, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या 

राम मंदिर भाजपचा चुनावी जुमला : उद्धव ठाकरे 

उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात जाणार   

उद्धव ठाकरेंसोबत चांदीची वीट, राम मंदिराची पायाभरणी?