नवी दिल्ली : भारताच्या धडाकेबाज माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी (Sushma Swaraj) वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली.
सुषमा स्वराज यांच्या निधनाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. “माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील गौरवशाली अध्याय समाप्त झाला आहे. सुषमा स्वराज यांनी देशासाठी केलेल्या कामांसाठी नेहमीच स्मरणात राहतील.”
Sushma Ji was a prolific orator and outstanding Parliamentarian. She was admired and revered across party lines.
She was uncompromising when it came to matters of ideology and interests of the BJP, whose growth she immensely contributed to.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019
भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपला आहे. एक अशा नेता ज्यांनी सेवा आणि गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारत दु:खी आहे. सुषमा स्वराज देशातील करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत होत्या.
सुषमा स्वराज या जबरदस्त वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्व पक्षीयांकडून मान सन्मान मिळाला. जेव्हा जेव्हा विचारसरणी आणि भाजपच्या हिताचा मुद्दा असेल, तिथे त्यांनी कधीच तडजोड केली नाही. विचारसरणी आणि पक्षाच्या विकासासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं.
एक उत्तम प्रशासक म्हणून सुषमा स्वराज यांनी जी जी पदं भूषवली, तिथे तिथे सर्वोच्च योगदान दिलं. अनेक देशांशी भारताचे संबंध सुधारण्यात सुषमा स्वराज यांची महत्त्वाची भूमिका होती. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.
सुषमा स्वराज यांच्या निधनाने माझं वैयक्तिक नुकसान झालं आहे. भारतासाठी त्यांनी दिलेलं योगदान देश कधीही विसरु शकणार नाही. या दु:खद घटनेत कुटुंबीयांच्यासोबत आहोत. ओम शांती!
संबंधित बातम्या :
Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
57 मुस्लिम देशांसमोर सुषमा बरसल्या होत्या, भारत गांधींचा देश, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते!
Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!
विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द