मॉस्को, रशिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर (PM Modi Russia Visit) आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि मोदी यांची बुधवारी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी जहाज बांधणी कॉम्प्लेक्सचा दौराही (PM Modi Russia Visit) केला. याचवेळी पंतप्रधान मोदींनी 19 वर्षांपूर्वीच्या एका क्षणाला उजाळा दिला. गेल्या 21 वर्षात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत घट्ट झालेल्या मैत्रीचाही त्यांनी उल्लेख केला.
पंतप्रधान मोदींनी चार फोटो शेअर करत 2001 ते 2019 या काळातील प्रवासाबाबत सांगितलं. “20 व्या भारत-रशिया शिखर संमेलनात सहभाग घेताना 2001 च्या भारत-रशिया शिखर संमेलनाचीही आठवण झाली, जेव्हा अटलजी (तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी) पंतप्रधान होते. त्यावेळी मला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शिष्टमंडळासोबत या संमेलनात सहभाग घेण्याची संधी मिळाली होती,” असं ट्वीट मोदींनी केलं.
Memories and moments, from 2001 and 2019!
While participating in the 20th India-Russia Summit today, my mind also went back to the India-Russia Summit of November 2001 when Atal Ji was PM. That time, I was honoured to be a part of his delegation as Gujarat CM. pic.twitter.com/G9vHMkagfR
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2019
पंतप्रधान मोदींची पुतीन यांच्यासोबत भेट झाली तेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून रशियाला गेले होते. यावेळी ते पंतप्रधान म्हणून पुतीन यांना भेटले. त्या भेटीत पुतीन यांनी फक्त दोन्ही देशांबाबतच नव्हे, तर जगभरातील समस्यांबाबत बातचीत केल्याचंही मोदी यापूर्वी म्हणाले होते.
पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्या द्विपक्षीय चर्चेबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी माहिती दिली. दोन्ही देशांमध्ये 15 एमओयू (सहकार्य करार) झाले असून पुढच्या वर्षी मे महिन्यात पुन्हा एकदा रशियाच्या दौऱ्यावर जातील, असं त्यांनी सांगितलं. पुतीन यांनी मोदींना द्वितीय विश्व युद्धात रशियाने मिळवलेल्या विजयाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्याच्या सेलिब्रेशनच्या मुहूर्तावर मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे.
रशियातील व्लादिवोस्तोकमध्ये झालेल्या या भेटीत मोदी आणि पुतीन यांची मैत्री पुन्हा एकदा दिसून आली. मोदींचं आगमन होताच पुतीन यांनी गळाभेट घेऊन स्वागत केलं. दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या पलीकडे जाऊन व्यापार, पर्यटन आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबत करार झाले.