PM CM Meeting Live नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी सलग दोन दिवस पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. आज (मंगळवार 16 जून) आणि उद्या (17 जून) ही बैठक होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या बातचीत होणार आहे. (PM Narendra Modi CM Video Conference Meeting)
सर्व मुख्यमंत्र्यांना अधिक वेळ बोलता यावे, म्हणून यावेळी दोन दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान आज 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद आहेत. कोरोनाचा फैलाव जादा असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदी उद्या चर्चा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उद्याच्या यादीत समावेश झाला आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि अनलॉक हा बैठकीचा अजेंडा आहे. दोन्ही दिवशी ही बैठक दुपारी 3 वाजता सुरु होईल
काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी आज चर्चा करतील. याशिवाय ज्या राज्यांमध्ये कोरोना रिकव्हरी रेट जास्त आहे, अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही आजच पंतप्रधानांची चर्चा होईल. यामध्ये पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड आणि झारखंड यासारख्या राज्यांचा समावेश आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 जून रोजी पंतप्रधान मोदी ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह इतर राज्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याअगोदर पाच वेळा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. प्रत्येक बैठकीनंतर मोदींनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे 16 आणि 17 जून रोजी होणाऱ्या बैठकींकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठका
पहिली बैठक – 20 मार्च
दुसरी बैठक – 2 एप्रिल
तिसरी बैठक – 11 एप्रिल (PM Narendra Modi CM Video Conference Meeting)
चौथी बैठक – 27 एप्रिल
पाचवी बैठक – 11 मे
सहावी बैठक – 16-17 जून
Prime Minister Narendra Modi to interact with Chief Ministers of all states and union territories today and tomorrow. (file pic) pic.twitter.com/PvRULr4068
— ANI (@ANI) June 16, 2020
(PM Narendra Modi CM Video Conference Meeting)