मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये ‘ती’ कोकची बाटली का ठेवली होती? अखेर कोडं सुटलं

| Updated on: Sep 26, 2019 | 3:30 PM

द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली (Bilateral Meeting in US). यावेळी मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये एक शीतपेयाची बाटली ठेवण्यात आली होती (Coke Bottle between Modi and Trump). पत्रकार परिषदेत या बाटलीने सर्वांचे लक्ष स्वत:कडे आकर्षित केले.

मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये ती कोकची बाटली का ठेवली होती? अखेर कोडं सुटलं
Follow us on

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या तीन दिवसांमध्ये दोनवेळा भेट झाली (PM Modi And Donald Trump). पहिल्यांदा टेक्सास येथील ह्यूस्टन येथे झालेल्या ‘हाउडी मोदी’ (Howdy Modi) या कार्यक्रमात आणि त्यानंतर यूनाइटेड नेशन्स जनरल असेंबलीमध्येही ते सोबत होते. येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली (Bilateral Meeting in US). यावेळी मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये एक शीतपेयाची बाटली ठेवण्यात आली होती (Coke Bottle between Modi and Trump). पत्रकार परिषदेत या बाटलीने सर्वांचे लक्ष स्वत:कडे आकर्षित केले.

कोका कोलाच्या या बाटलीवरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मोदी आणि ट्रम्प यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली (Coke Bottle between Modi and Trump). यावरुन अनेक मीम्सही बनवण्यात आले आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले. मात्र, ही बाटली मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये का ठेवण्यात आली, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. अनेकांनी या बाटलीतील पेय काय असेल यावरुन अंदाजही लावला. कुणी याला ‘ट्रम्प अप’, ‘काला कोला’ तर कुणी ‘मशरुम सिरप’ म्हटलं.

हे प्रकरण इतकं वाढलं की प्रसार भारतीला अखेर यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि या बाटलीत नेमकं काय होतं (Coke Bottle between Modi and Trump) आणि ती मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये का ठेवली गेली, हे कोडं सुटलं. प्रसारभारतीने याबाबत ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं.

डोनाल्ड ट्रम्प यांना नियमितपणे कोक पिण्याची सवय आहे. ज्या अमेरिकन लोकांनी द्विपक्षीय चर्चा आयोजित केली होती, त्यांनी ट्रम्प यांच्यासाठी या कोकच्या बाटलीची सोय केली होती, असं प्रसार भारतीने सांगितलं. त्यामुळे या कोकच्या बाटलीच्या प्रकरणाला पूर्ण विराम लागला आहे.

संबंधित बातम्या :

तुमचं तंत्रज्ञान, आमचं यंग टॅलेंट, मोदींचं उद्योजकांना ‘Come to India’

मोदींनी वडिलांप्रमाणे सर्वांना सोबत घेतलं, ते भारताचे राष्ट्रपिता : डोनाल्ड ट्रम्प

मोदींनी वडिलांप्रमाणे सर्वांना सोबत घेतलं, ते भारताचे राष्ट्रपिता : डोनाल्ड ट्रम्प

अबकी बार, ट्रम्प सरकार, डोनाल्ड ट्रम्पवर मोदींची स्तुतिसुमनं