PM Narendra Modi Birthday : नेते मंडळी आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा पाऊस

| Updated on: Sep 17, 2019 | 1:56 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Birthday) यांचा आज म्हणजेच 17 सप्टेंबरला 69 वा वाढदिवस आहे. या प्रसंगावर नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, नेते मंडळी मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

PM Narendra Modi Birthday : नेते मंडळी आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा पाऊस
Follow us on

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Birthday) यांचा आज म्हणजेच 17 सप्टेंबरला 69 वा वाढदिवस आहे. या प्रसंगावर नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती, नेते मंडळी मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ट्वीटरवर तर सोमवारी (16 सप्टेंबर)रात्रीपासूनच #HappyBirthdayNarendraModi टॉप ट्रेंडमध्ये आहे.

आज ट्वीटरवर 8 पैकी 7 ट्रेंड हे मोदींच्या वाढदिवसावर आहेत. यामध्ये #HappyBdayPMModi, #HappyBirthdayPM, #NarendraModiBirthday यासारखे हॅशटॅग्‍स ट्रेंडिंग आहेत

नेते मंडळी आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छा

देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदींचे सर्वात निकटवर्तीय असलेले अमित शाह (Amit Shah) यांनींही ट्वीटरच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा दिल्या. “दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व आणि अथक परिश्रमचे प्रतिक देशातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वात भारताने जगात एक मजबूत, सुरक्षित आणि विश्वसनीय देशाच्या रुपात आपली ओळख बनवली आहे. विकासासोबतच भारतीय संस्कृतीला आणखी समृद्ध करण्यात मोदीजी यांचं अभूतपूर्व योगदान आहे”, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं.

“मोदीजींनी एक रिफार्मिस्टच्या रुपात केवळ राजकारणाला एक नवी दिशाच दिली नाही, तर आर्थिक सुधारणेसोबतच दशकांपासून चालत आलेल्या समस्यांचं समाधानही काढलं. प्रत्येक भारतीयाच्या जीवानाला अधिक चांगलं बनवण्यासाठी तुमचे परिश्रम आणि संकल्प आमच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. एक जनप्रतिनिधी, एक कार्यकर्ता आणि एक देशवासीच्या रुपात तुमच्यासोबत राष्ट्रीय पुनर्रचनेत भागीदार होणे हे माझं सुदैव आहे. तुम्ही नेहमी निरोगी राहावे आणि दीर्घायुषी व्हावे हीच देवाचरणी प्रार्थना”, असंही अमित शाह म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने 3.31 मिनिटांचा एक व्हिडीओ ट्वीट करत पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून मोदींनी शुभेच्छा दिल्या. “नरेंद्र भाई, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी व्हावे, तसेच भारताला विश्व गुरु बनवण्याच्या आमच्या सर्वांच्या स्वप्नांना आम्ही तुमच्या नेतृत्वात पूर्ण करु, अशी प्रार्थना करतो”, असं ट्वीट गडकरींनी केलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “विकासपुरुष, नवभारताचे शिल्पकार आमचे नेते मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या संपूर्ण महाराष्ट्रातर्फे कोटी कोटी शुभेच्छा ! चला आपण सारे सेवा सप्ताहात सहभागी होऊ या…”, असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनींही पंतप्रधानांच्या वाढदिवशी त्यांनी निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी मोदींना जगातील सर्वात करिश्माई नेता असल्याचं सांगितलं.


माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही मोदींचा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अमूल कॉर्पोरेशननेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “एक नवीन भारत घडवण्यात तुमचं नेतृत्व आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही ट्वीटरवर मोदींना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनमी मोदींना नव्या भारताचे शिल्पकार म्हटलं.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोलही यानेही ट्वीटरच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.