नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार निवडणुकीतील भाजपच्या यशानंतर आयोजित धन्यवाद रॅलीत विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालचं थेट नाव न घेता तेथे भाजप नेत्यांच्या हत्या होत असल्याचा आरोप केला. तसेच ते लोकशाही मार्गाने भाजपचा सामना करु शकत नसल्यानेच हा हत्येचा मार्ग अवलंबला असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं. या हत्येंसाठी मी इशारा देण्याची गरज नाही. जनताच त्यांना इशारा देईल, असंही ते म्हणाले (PM Narendra Modi criticize indirectly West Bengal Mamata Banerjee for Killing BJP Activist).
नरेंद्र मोदी म्हणाले, “जे लोक लोकशाही पद्धतीने आपला सामना करु शकत नाही, आपल्याला आव्हान देऊ शकत नाही, असे काही लोक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा मार्ग अवलंबला आहे. देशाच्या काही भागात त्यांना वाटतं भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या करुन ते आपला हेतू साध्य करतील. मी त्यांना अगदी आग्रहाने समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला इशारा देण्याची गरज नाही. कारण इशारा देण्याचा काम जनताच करेल.”
“निवडणुका येतात-जातात. जय-पराजय होत राहतात. सत्तेवर कधी हा बसेल, कधी तो बसेल, मात्र हा हत्येचा खेळ लोकशाहीत कधीही यशस्वी होणार नाही. मृत्यूचा खेळ खेळून कुणालाही मतं मिळवता येणार नाही. हे भिंतीवर लिहिलेले शब्द एकदा वाचून घ्या. आपण लोकशाहीसाठी समर्पित आहोत. भाजपतील कार्यकर्ते आपल्या उद्देशापासून तसुभरही डगमगणार नाहीत,” असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
#WATCH Those who aren’t able to challenge us in a democratic way, they have taken up killing of BJP workers in some parts of the country to fulfil their desires. I want to make them understand that this dance of death won’t help them win a mandate: PM Modi addressing BJP workers pic.twitter.com/MJYZPMLqy4
— ANI (@ANI) November 11, 2020
‘महिला भाजपच्या सायलन्ट व्होटर, त्या भाजपला सातत्याने मतदान करत आहेत’
नरेंद्र मोदी म्हणाले, “देशाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. भाजपकडे सायलन्ट व्होटर आहे. तोच भाजपला निरंतर मतदान करतोय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तो सायलंट व्होटर देशातील माता, भगिनींचा महिलावर्ग आहे. देशभरातील महिला व्होटर भाजपाची सर्वात मोठी सायलंट व्होटर आहे. भाजपच्या राज्यातच महिलांना सुरक्षा आणि सन्मान मिळतोय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले आहे.”
“पूर्वी बिहारच्या निवडणुकीत किती लोक मारले, किती बुथ लुटले अशाच बातम्या असायचा”
“काही गोष्टी तर आम्ही विसरलो आहोत. काही वर्षांपूर्वी निवडणूक व्हायची, तेव्हा दुसऱ्यादिवशी किती बुथ लुटले गेले, अशा प्रकारच्या बातम्या यायच्या. मात्र, आज मतदानाचा टप्पा किती वाढला, किती महिलांचं मतदान वाढलं, याबाबत बातम्या असतात. पूर्वी बिहारच्या निवडणुकीत किती लोक मारले गेले, किती बुथ लुटले गेले, अशाच बातम्या असायचा. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीतही शांततापूर्ण मतदान झाले. कोरोना संकटात मतदानासाठी लोक घराबाहेर पडले, हीच तर खरी ताकद आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.
नरेंद्र मोदी म्हणाले, “कोरोना संकटात निवडणूक करणं सोपं नव्हतं. पण आपल्या व्यवस्था इतक्या मजबूत आहेत की, संकट काळात निवडणूक घेऊन भारताची ताकद दाखवली. या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचं जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. बिहारमधील विजय हा जे. पी. नड्डा यांची कुशलता आणि प्रभावी रणनितीचाही परिणाम आहे. नड्डाजी तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत.”
संबंधित बातम्या :
Prime Minister Narendra Modi : भाजपकडे सायलंट व्होटर; तोच भाजपला निरंतर मतदान करतोय : नरेंद्र मोदी
‘जीत का उन्माद नही, हार का अवसाद नही, हेच आमचं धोरण’; मोदींनी सांगितला विजयाचा मंत्र
संबंधित व्हिडीओ :
PM Narendra Modi criticize indirectly West Bengal Mamata Banerjee for Killing BJP Activist