नवी दिल्ली : गुरुवारपासून देशात दिवाळीच्या शुभपर्वाला सुरुवात झाली आहे. देशात आनंदाचं वातावरण आहे. कोरोनाकाळात देश दिवाळी साजरी करत आहे. अशावेळी सीमेवर राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे. जैसलमेरमध्ये जवानांसोबत पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करण्याची शक्यता आहे. (pm Narendra modi Diwali Celibration India Army jawan)
जैसलमेरमधल्या भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांसोबत यंदाची दिवाळी साजरी करण्याचा पंतप्रधान मोदींचा विचार आहे. यावेळी मोदींबरोबर सीडीएस प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम.एम. नरवणे देखील उपस्थित असू शकतात.
याअगोदरही पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. याआधी जम्मू काश्मीर, उत्तराखंड तसंच अन्य ठिकाणी जाऊन मोदींनी दिवाळी साजरी केली आहे. यंदा जैसलमेरमध्ये जाऊन ते दिवाळी साजरी करतील. यावेळी जवानांसोबत काही वेळ ते चर्चा करतील तसंच त्यांना मिठाई भरवतील.
Spending time with our Forces gives me new energy. We exchanged sweets & interacted. Happy to know the Jawans practice Yoga regularly. pic.twitter.com/zvHmaO8bPv
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2017
मागील काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांची लेह भेट
मागील काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहला भेट दिली. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर त्यांची लेह भेट विशेष महत्त्वाची मानली गेली. लेह दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत संवाद साधला होता तसंच त्यांचा आत्मविश्वास बुलंद केला होता.
दरम्यान, कोरोनाचं संकट भारतातून आणखी गेलं नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी साजरी करताना कोरोनाचे नियम पाळा, असं आवाहन मोदी यांनी केलं आहे. (pm Narendra modi Diwali Celibration India Army jawan)
संबंधित बातम्या
हत्येचा खेळ लोकशाहीत कधीही यशस्वी होणार नाही, त्यानं मतं मिळणार नाही : नरेंद्र मोदी
घराणेशाहीवाले पक्ष लोकशाहीसाठी सर्वाधिक धोकादायक; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल