HOWDY MODI : दहशतवादाविरोधात लढाईची वेळ, ट्रम्पही भारतासोबत : नरेंद्र मोदी

| Updated on: Sep 23, 2019 | 12:25 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'हाउडी मोदी' (Howdy Modi Event in Houston) या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर भाष्य केलं. आता आपल्याला दहशतवादाविरोधात लढण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले.

HOWDY MODI : दहशतवादाविरोधात लढाईची वेळ, ट्रम्पही भारतासोबत : नरेंद्र मोदी
Follow us on

Howdy Modi Event in Houston : ह्यूस्टन (टेक्सास) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘हाउडी मोदी’ (Howdy Modi Event in Houston) या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर भाष्य केलं. आता आपल्याला दहशतवादाविरोधात लढण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. तसेच, या लढाईत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही मजबुतीने आपल्यासोबत आहेत, असंही मोदी म्हणाले. तसेच, यावेळी मोदींनी पाकिस्तानवरही निशाणा साधला.

मोदी आज (22 सप्टेंबर) अमेरिकाच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी टेक्सास येथील ह्यूस्टनच्या अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींसाठी ‘हाउडी मोदी’ (Howdy Modi Event in Houston) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ह्यूस्टन येथे आलेल्या पंतप्रधान मोदींचे तेथील अनिवासी भारतीय नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय उत्साहात स्वागत केलं. या कार्यक्रमात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

ह्यूस्टनच्या काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी कलम 370 हटवल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही व्यक्त केले. ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडिअमवर (NGR stadium) पंतप्रधान मोदींचा हा ‘हाउडी मोदी’ पार पडत आहे. यावेळी मोदींसह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

LIVE UPDATE :

[svt-event date=”23/09/2019,12:13AM” class=”svt-cd-green” ] भारत-अमेरिकेतील संबंध दोन्ही देशांचे स्वप्न पूर्ण करेल : मोदी

[svt-event date=”23/09/2019,12:12AM” class=”svt-cd-green” ] तुम्ही मायभूमीपासून दूर आहात, मात्र, सरकार तुमच्यापासून दूर नाही, परदेशात काम करणाऱ्या नागरिकांनाही सरकार मदत करणार : मोदी [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:10AM” class=”svt-cd-green” ] कॉर्पोरेट करात केलेल्या कपातीमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल : मोदी [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:09AM” class=”svt-cd-green” ] भारत आज आव्हानांपासून पळत नाही, तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी तयार राहतो : मोदी [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:09AM” class=”svt-cd-green” ] आता दहशतवादाविरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे, या लढाईत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही सहभागी : मोदी [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:07AM” class=”svt-cd-green” ] जे स्वत:चा देश सांभाळू शकत नाहीत, ते भारताच्या प्रगतीवर, उचललेल्या पावलांवर जळतात, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका केली [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:05AM” class=”svt-cd-green” ] भारताने अखेर ‘एक देश, एक कर’ संकल्पना प्रत्यक्षात आणली : मोदी [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:04AM” class=”svt-cd-green” ] आम्ही 15 कोटी लोकांना गॅस जोडणी दिली, पाच वर्षात आता जवळपास 100 टक्के कुटुंब बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले, पाच वर्षात ग्रामीण भागात तब्बल 2 लाख किमी रस्त्यांची निर्मिती : पंतप्रधान मोदी [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:02AM” class=”svt-cd-green” ] नवीन भारताच्या निर्मितीसाठी आमची स्पर्धा आमच्यासोबतच आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:01AM” class=”svt-cd-green” ] यावेळी मोदींनी भारतातील लोकसभा निवडणुकांचाही मुद्दा उचलला. 60 वर्षांनंतर भारतात पूर्ण बहुमत असलेली सरकार आल्याचंही मोदींनी नमुद केलं.’संकल्प से सिद्धी हैं, और संकल्प न्यू इंडिया हैं’ ही आज भारताची सर्वात मोठी घोषणा आहे. यासाठी भारत दिवस-रात्र काम करत आहे. [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,11:58PM” class=”svt-cd-green” ] या कार्यक्रमात जे लोक येण्यासाठी उत्सुक होते, मात्र ते रजिस्ट्रेशन न झाल्याने येऊ शकले नाहीत. त्यांची मी व्यक्तीगतरित्या माफी मागतो : मोदी [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,11:56PM” class=”svt-cd-green” ] हाउडी मोदीचं उत्तर, भारतात सगळं छान चाललं आहे : मोदी [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,11:56PM” class=”svt-cd-green” ] हाउडी माय फ्रेंड्स, हे जे वातावरण आहे ते कल्पनेच्या आड आहे. आज आपण इथे एका नवीन इतिहासासोबतच केमिस्ट्रीही पाहत आहोत. एनआरजीची उर्जा ही भारत-अमेरिकेच्या वाढत्या ताळमेळाची साक्षीदार आहे : मोदी [/svt-event]

[svt-event date=”23/09/2019,12:05AM” class=”svt-cd-green” ] भारत हा अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र आहे. भारताला नरेंद्र मोंदीच्या रुपात अमेरिकेप्रमाणे चांगला राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. भारत आणि अमेरिकेचे संविधान we the people ने सुरु होते. मोदींच्या राज्यात 30 कोटी लोक गरीबीतून मुक्त झाले. अमेरिकेची अर्थव्यवस्था सर्वात चांगली आहे. लवकरच भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश सुरक्षेवर एकत्रित काम करणार आहेत. आम्ही इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करण्यास सज्ज आहोत : डोनाल्ड ट्रम्प [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,11:11PM” class=”svt-cd-green” ] मी स्वत:ला नशिबवान मानतो की मी पंतप्रधान मोदींसोबत आहे. भारत-अमेरिका एक मेकांचा आदर करतात – ट्रम्प

[svt-event date=”22/09/2019,11:11PM” class=”svt-cd-green” ] मोदींना लोकसभा निवडणुकांमधील विजयाबाबत शुभेच्छा – ट्रम्प [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,11:11PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात खूप चांगलं काम करत आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन मी खूप आनंदी आहे – डोनाल्ड ट्रम्प [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,11:03PM” class=”svt-cd-green” ] अबकी बार ट्रम्प सरकार, अशी घोषणाही यावेळी मोदींनी केली. मोदींनी त्यांच्या खास शैलीत डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं

[svt-event date=”22/09/2019,11:02PM” class=”svt-cd-green” ] जेव्हा मी पहिल्यांदा ट्रम्प यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले होते, भारताचा एक खरा मित्र व्हाईट हाऊसमध्ये आहे, आज त्यांची या कार्यक्रमातील उपस्थिती त्यांच्या त्या वाक्याला सिद्ध करणारी आहे. 2017 मध्ये तुम्ही मला तुमच्या कुटुंबाची भेट घालून दिली आझ मी तुम्हाला माझ्या कुटुंबाची भेट घालून देतो. [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,11:01PM” class=”svt-cd-green” ] मला ट्रम्प यांच्यासोबत भेटण्याच्या अनेक संधी मिळतात, यासाठी मी स्वत:ला नशिबवान समजतो, जेव्हाही मी त्यांना भेटतो तेव्हा ते मला एखाद्या मित्राप्रमाणे भेटतात. ते म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. त्यांच्यातील लिडरशिप, अमेरिकेला पुढे घेऊन जाण्याची जिद्द, अमेरिकेला जगात सर्वात बलाढ्य देश बनवण्याचे त्यांचे प्रयत्न मला प्रभावित करतात, असंही मोदी म्हणाले. [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,10:59PM” class=”svt-cd-green” ] “या सकाळी आपल्यासोबत एक अत्यंत खास व्यक्ती आहे, त्यांना कुठल्याही ओळखीची गरज नाही, त्यांना संपूर्ण जग ओळखतं, त्यांचं नाव प्रत्येक चर्चेत असतं, त्यांचा शब्द हा प्रामुख्याने पाळला जातो, ते खूप प्रसिद्ध आहेत, त्यांचा प्रभाव हा सर्वत्र पाहायला मिळतो, ते आज आपल्यासोबत आहेत, हे माझं सौभाग्य आहे की या कार्यक्रमात ते आज आपल्या सोबत आहेत”, अशा शब्दांत मोदींकडून ट्रम्प यांचं कौतुक [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,10:39PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनआरजी स्टेडियममधील भेट

[svt-event date=”22/09/2019,10:37PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कार्यक्रम स्थळी पोहोचले, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांचं स्वागत केलं

[/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,9:40PM” class=”svt-cd-green” ] ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले, मोदी-मोदीच्या घोषणेत आणि टाळ्यांच्या गडगडाटात मोदींचं स्वागत

[svt-event date=”22/09/2019,9:29PM” class=”svt-cd-green” ]पंतप्रधान मोदी एनजीआर स्टेडियममध्ये दाखल, थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प मंचावर येणार, उपस्थित अनिवासी भारतीयांची उत्सुकता शिगेला [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,8:55PM” class=”svt-cd-green” ] ‘हो हा दिवस खरंच चांगला असणार आहे, लवकरच आपली भेट होईल हीच अपेक्षा’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्वीटला उत्तर देत पंतप्रधान मोदी यांनी हे ट्वीट केलं.

[svt-event date=”22/09/2019,8:41PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमासंबंधी ट्वीट केलं. ‘आज मी माझ्या मित्रासोबत ह्यूस्टनमध्ये असणार आहे. टेक्सासमध्ये हा अत्यंत चांगला दिवस असेल’, असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं.

[svt-event date=”22/09/2019,8:19PM” class=”svt-cd-green” ] ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘जन गण मन’ने होईल. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प आणि हजारो अनिवासी भारतीयांसमोर एक खास मुलगा स्पर्श याची सुरुवात करेल. [/svt-event]

[svt-event date=”22/09/2019,8:15PM” class=”svt-cd-green” ] ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी एनआरजी स्टेडियममध्ये लोक जमण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी स्टेडियममध्ये लोकांनी ‘वंदे मातरम’, ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देण्यात आल्या. काही लोकांनी ‘मंदिर यहीं बनाएंगे’ अशाही घोषणा दिल्या.

[svt-event date=”22/09/2019,8:13PM” class=”svt-cd-green” ] अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यूस्टनसाठी निघाले, काहीच वेळात ते कार्यक्रमस्थळी पोहोचतील, या कार्यक्रमात मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे 100 मिनिटांपर्यंत सोबत राहतील, या दरम्याव ट्रम्प 30 मिनिटांचं भाषण करतील

[svt-event date=”22/09/2019,8:10PM” class=”svt-cd-green” ] ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमसाठी लोक एनआरजी स्टेडियममध्ये पोहोचत आहेत. लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्टेडियममध्ये ‘मोदी-मोदी’ च्या घोषणाही देण्यात आल्या.