नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहील, पुढील 5 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 1 किलो हरभरा डाळ मोफत देणार अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. (PM Narendra Modi mentions Bulgarian Prime Minister Boyko Borissov who was fined for not wearing mask at public place)
भाषणात नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता एका देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख केला. त्या पंतप्रधानांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गेल्याने 13 हजार रुपये इतक्या रकमेचा दंड ठोठवण्यात आला, असं मोदी म्हणाले. भारतातही स्थानिक प्रशासनाला अशाचप्रकारे काम करावं लागेल. हे 130 कोटी देशवासियांच्या संरक्षणाचं एक अभियान आहे. भारतात गावाचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, सर्वांना नियम सारखे आहेत. कुणीही नियमांपेक्षा मोठा नाही, असं मोदी म्हणाले.
मोदींनी केलेल्या उल्लेखानंतर हे पंतप्रधान कोणत्या देशाचे आहेत, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे, तर ते आहेत बल्गेरियन पंतप्रधान बॉयको बोरिस्कोव्ह.
बोरिस्कोव्ह यांना स्वतःच्या सरकारकडूनच दंड
एका चर्चला दिलेल्या भेटीवेळी बॉयस्को बोरिस्कोव्ह यांनी मास्क घातला नव्हता. आपल्याच सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना 300 लेव्ह्ज (बल्गेरियन चलन) म्हणजे अंदाजे 13 हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला. ही बातमी गेल्या आठवड्यात म्हणजे 24 जून रोजी स्थानिक वर्तमानपत्रात आली होती.
Bulgarian PM to be fined for not wearing face mask in church https://t.co/WAOod8NSfq pic.twitter.com/scmy7n2BRR
— Reuters (@Reuters) June 23, 2020
“रिला येथील चर्चमध्ये पंतप्रधानांच्या भेटीवेळी मास्क न घातलेल्या सर्व व्यक्तींना दंड ठोठावण्यात येईल” असे बल्गेरियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. यामध्ये अनेक पत्रकार, छायाचित्रकार यांचाही समावेश होता.
नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण
कोरोनाविरोधात लढताना आपण अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. याशिवाय सर्दी, खोकला, ताप या आजारांची लागण होणाऱ्या वातावरणातही आपण प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत माझी देशातील सर्व नागरिकांना प्रार्थना आहे की, सगळ्यांची काळजी घ्या.
जगभरातील देशांच्या तुलनेने भारताची स्थिती चांगली आहे. योग्य वेळी करण्यात आलेला लॉकडाऊन आणि इतर निर्णयामुळे भारतात लाखो लोकांचं जीवन वाचलं आहे. पण जेव्हापासून देशात अनलॉक 1 सुरु झालं आहे, तेव्हापासून व्यक्तीगत आणि सामाजिक व्यवहारात निष्काळजीपणा वाढत चालला आहे. सुरुवातीला आपण मास्क वापरणं, सोशल डिस्टिन्सिंग ठेवण्यात आणि हात धुण्याबाबत खूप सतर्क होतो. मात्र, आज जेव्हा आपल्याला जास्त सतर्कताची गरज असताना निष्काळजीपणा वाढणं चिंताजनक आहे.
LIVETV | अनलॉकच्या काळात जास्त खबरदारी घेणे आवश्यक, एका देशाच्या पंतप्रधानांना मास्क न लावल्याने दंड आकारला, स्थानिक प्रशासनाने अशीच उत्स्फूर्तता दाखवणे आवश्यक, कायद्यासमोर सगळे सारखे : नरेंद्र मोदीhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/uuHe3EHFWU
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 30, 2020
लॉकडाऊनदरम्यान खूप गंभीरपणे नियमांचं पालन केलं गेलं. आतादेखील राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि देशाच्या नागरिकांना तशाचप्रकारे गांभीर्याने घेणं जरुरीचं आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये तर प्रचंड लक्ष द्यावं लागेल. जे नियमांचं पालन करणार नाही, त्यांना समजावावं लागेल.
लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारची देशातील प्रत्येक घरात चूल पेटालं ही सर्वात पहिली प्राथमिकता होती. एकाही नागरिकाने भुकेल्या पोटी झोपी नये यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली.
देश असो किंवा व्यक्ती वेळेवर आणि संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यावर कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती वाढते. लॉकडाऊन होताच सरकार प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना घेऊन आलं. या योजने अंतर्गत गरिबांसाठी 1.75 लाख कोटींचं पॅकेज दिलं गेलं. गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी कुटुंबांच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
यासोबतच गावांमध्ये श्रमिकांना रोजगार देण्यासाठी प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेचं अभियान वेगाने सुरु आहे. या अभियानासाठी सरकार 50 हजार कोटी रुपयांचा खर्च करत आहे.
कोरोनाने जगाला हैराण केलं आहे. कोरोनासोबत लढताना भारतात 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना 3 महिन्यांचे रेशन पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्यात आले. याशिवाय 1 किलो डाळदेखील मोफत दिलं गेलं. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अडीच पटीने जास्त लोकसंख्येला, ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा 12 पटीने जास्त लोकांना आमच्या सरकारने मोफत अन्नधान्य दिलं आहे. (PM Narendra Modi mentions Bulgarian Prime Minister Boyko Borissov who was fined for not wearing mask at public place)