नवी दिल्ली : बरेच जण अद्यापही लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. कृपया स्वत:ला सुरक्षित ठेवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, सूचनांचे गंभीरपणे पालन करा. नागरिकांकडून नियम आणि कायद्यांचं पालन करुन घ्या, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना केली. (Narendra Modi on Lockdown)
लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता से पालन करें। राज्य सरकारों से मेरा अनुरोध है कि वो नियमों और कानूनों का पालन करवाएं।
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2020
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘माझे नागरिकांना आवाहन आहे की अपरिहार्यता असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाची अति गांभार्याने नोंद घेऊन पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. ही लढाई आपण जिंकणारच, गरज आहे संयम, समंजसपणा व योग्य दक्षतेची!’ असं ट्वीट पवारांनी केलं आहे.
‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल राज्य सरकारने नागरी भागात जमावबंदी आदेश लागू करुनही लोक रस्त्यावर घोळक्याने जमा होत आहेत. वाहनांवरुन जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. इतर देशांतील परिस्थिती ध्यानात घेता नागरिकांनी वेळीच गांभीर्याने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.’ असं पवारांनी सुनावलं. (Narendra Modi on Lockdown)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल राज्य सरकारने नागरी भागात जमावबंदी आदेश लागू करूनही लोक रस्त्यावर घोळक्याने जमा होत आहेत. वाहनांवरून जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. इतर देशांतील परिस्थिती ध्यानात घेता नागरिकांनी वेळीच गांभीर्याने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. pic.twitter.com/Yu8Usf2OkL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 23, 2020
दरम्यान, जनता कर्फ्यूच्या दिवशी नरेंद्र मोदींनी ‘थाळीनाद’ करुन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्याच्या पद्धतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘जर आपण भीती आणि चिंतेच्या वातावरणात उत्सवासारखी परिस्थिती निर्माण केली असेल, तर असंच होणार. जर सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर असेल’ असा टोमणा मारला.
हमारे प्रधान मंत्री की चिंता है की,’लाॅकडाऊन’ को अभी भी लोग गंभीरतासे नहीं ले रहे है.प्रिय प्रधान मंत्री जी,आपने डर और चिंता के माहोल मे भी तयौहार जैसी स्थिती पैदा कर दि तो ऐसा ही होगा. सरकार गंभीर होगी तो जनता गंभीर होगी
जय हिंद जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) March 23, 2020