नवी दिल्ली : ‘कोरोना’ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चौैथ्यांदा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला (PM Modi on Lockdown Extension). येत्या 3 मे ला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. त्यानंतर पुढील रणनिती आखण्यासाठी आज (27 एप्रिल) सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. सकाळी 10 वाजता सुरु झालेली ही बैठक जवळपास तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पंतप्रधान मोदींची राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाबाबत ही चौथी (PM Modi on Lockdown Extension) व्हिडीओ कॉन्फरन्स होती. भारतावर कोरोनाचं संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करुन ठरवायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
लॉकडाऊनचा निर्णय राज्यांनी घ्यावा
“येत्या 3 मे रोजी लॉकडाऊन संपत असला तरी रेड आणि ऑरेंज झोनमध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ज्या राज्यात जास्त रुग्ण आहेत, त्या ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे. तर ज्या राज्यात कमी रुग्ण आहे, त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार सूट दिली जाऊ शकते. याचा निर्णय प्रत्येक राज्यांनी घ्यावा,” असेही मोदींनी या बैठकीत सांगितले.
तसेच कोरोनामुळे आर्थिक संकट आलं असलं तरी कोणतेही टेन्शन घेऊ नका. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील विविध जिल्ह्यांना ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोननुसार वेगवेगळं केलं आहे. यात जवळपास 170 पेक्षा अधिक जिल्हे हे रेड झोनमध्ये असल्याचेही मोदींनी सांगितले.
तीन तास बैठक
या बैठकीला सकाळी 10.30 ला सुरुवात झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह इतर नेतेही सहभागी झाले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या बैठकीत सहभागी झाले होते. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन काही कारणास्तव या बैठकीला गैरहजर होते. जवळपास तीन तास ही बैठक सुरु होती.
या बैठकीत मेघालय, मिझारोम, पुद्देचरी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ओदिशा, बिहार, गुजरात आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळाली. तर इतर मुख्यमंत्र्यांनी आपली मत लिखीत स्वरुपात दिली. यावेळी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवावा, अशी मागणी केली.
पंतप्रधान मोदींची दोन वेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत दोन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत त्यांनी 11 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा आग्रह धरला होता. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणाही (PM Modi on Lockdown Extension) केली.
संबंधित बातम्या :
मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान, कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व प्रत्येकाकडे : पंतप्रधान मोदी
Mann Ki Baat : जगाला औषधांची मदत करुन भारताने संस्कृतीचं दर्शन घडवलं : पंतप्रधान