नवी दिल्ली : महाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकलं होतं, कोरोना विरोधातील युद्ध 21 दिवसात जिंकण्याचा प्रयत्न असेल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे (PM Narendra Modi on War against corona). ते आज (25 मार्च) देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही निवडक नागरिकांच्या प्रश्नांच्या माध्यमातून समाजातील कोरोनाविषयीच्या शंकांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी काबुलमधील गुरुद्वारमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लातील मृतांना आदरांजली व्यक्त केली. तसेच त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात संपूर्ण देश युद्ध लढत आहे. त्यासाठी आपल्याला 21 दिवस लागणार आहेत. महाभारताच्या काळातील युद्ध 18 दिवसांमध्ये जिंकलं होतं. आज देशातील कोरोना संसर्गाविरोधातील हे युद्ध आपण 21 दिवसात जिंकण्याचा प्रयत्न असेल.”
“जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेले 1 लाखाहून अधिक लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतातही अनेक लोक कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर आले आहेत. इटलीमध्ये तर 90 वर्षाहून अधिक वय असलेल्या आजी कोरोनातून वाचल्याची बातमी समजली. मात्र, आपल्याला सजग नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. एकमेकांपासून अंतर ठेवण्यावर लक्ष ठेवायचं आहे. कोरोनासारख्या संसर्गाला दूर ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.”
संकटाच्या काळात काशी सर्वांना मार्गदर्शन करु शकते. काशी सर्वांसाठी एक उदाहरण निर्माण करु शकते. काशीचा अनुभव शाश्वत, सनातन आहे. त्यामुळे आज लॉकडाऊनच्या परिस्थितीत काशी देशाला संयम, समन्वय आणि संवेदनशीलतेचा धडा देऊ शकते. तुमचा खासदार म्हणून मी या काळात मी तुमच्यासोबत असायला हवं होतं. मात्र, तुम्हाला दिल्लीत ज्या काही घटना घडत आहेत त्याची कल्पना आहे. येथील व्यस्त कामातही मी माझ्या सहकाऱ्यांकडून वाराणसीच्या परिस्थितीची माहिती घेत आहे, असंही मोदी म्हणाले.
You should not attempt to treat Coronavirus infection on your own. Stay at your home, do things only after consulting a doctor. Call them up, ask them, tell them your ailments. We will have to note that no vaccine has been developed for it so far, anywhere in the world: PM Modi pic.twitter.com/WboBTV1HPv
— ANI (@ANI) March 25, 2020
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नवरात्रीच्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. आई शैलपुत्री प्रेम, करुणा आणि ममतेचं रुप आहे. त्यांना निसर्ग देवीही म्हटलं जातं. आज देश ज्या संकटाच्या काळात आहे, यात आपल्या सर्वांना आई शैलसुतेच्या आशिर्वादाची खूप गरज आहे.”
संबंधित बातम्या :
80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Corona | भारतात फक्त 27 टक्के नागरिक घरात लॉकडाऊन, सर्व्हेत धक्कादायक माहिती
देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन, सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द
PM Narendra Modi on War against corona