नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांची वाढ केली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. ‘कोरोना’ रोखण्यासाठी नरेंद्र मोदींनी सप्तपदी सांगितली. सात गोष्टींसाठी साथ द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं. तोंडावर ‘गमछा’ अर्थात पंचा बांधून मोदींनी भाषणाला सुरुवात केली होती. (PM Narendra Modi Seven Tips during Lockdown)
कोरोना रोखण्यासाठी मोदींची सप्तपदी
1. घरातील ज्येष्ठांची, विशेषत: ज्यांना जुना आजार आहे त्यांची जास्त काळजी घ्या
2. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पाळा, घरगुती मास्क नक्वी वापरा
3. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन करा. गरम पाणी, काढा प्या.
4. ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा, इतरांनाही प्रेरीत करा
5. शक्य तेवढ्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या, भोजनाची व्यवस्था करा
6. आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. कुणालाही नोकरीवरुन काढू नका.
7. आपले डॉक्टर, नर्स आरोग्यरक्षक, सफाई कर्मचारी यांचा मान राखा, गौरव करा
हेही वाचा : PM Modi Live : संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा
पहली बात-
अपने घर के बुजुर्गों का विशेष ध्यान रखें
– विशेषकर ऐसे व्यक्ति जिन्हें पुरानी बीमारी हो,
उनकी हमें Extra Care करनी है, उन्हें कोरोना से बहुत बचाकर रखना है: PM @narendramodi #IndiaFightsCorona— PMO India (@PMOIndia) April 14, 2020
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे