कुणालाही नोकरीवरुन काढू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

| Updated on: Apr 14, 2020 | 11:36 AM

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi speech on lockdown) यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांची वाढ केली.

कुणालाही नोकरीवरुन काढू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi speech on lockdown) यांनी देशाला संबोधित करताना आज (14 एप्रिल) लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांची वाढ केली. यावेळी मोदींनी देशातील सर्व संस्थांना आवाहन केलं की, “आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. कुणालाही नोकरीवरुन काढून टाकू नका.”

कोरोनाचे रुग्ण देशात वाढू लागले तेव्हा 25 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi speech on lockdown) देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. त्यानंतर पुन्हा मोदींनी लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांची वाढ केली आहे. लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्याने याचा फटका अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना बसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या कामगारांचा पगार आणि कामगार कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदींनी कुणालाही कामावरुन काढू नका असं आवाहन केलं आहे.

मोदींनी 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले त्यावेळी अनेक कारखान्यातील मालकांनी मजूरांना हाकलून दिले होते. त्यामुळे देशभरात हजारो मजूर रस्त्यावर आले होते. त्यांच्यासाठी आणि गरिबांसाठीही केंद्र सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • अनेक कष्ट सोसून तुम्ही संकटाशी दोन हात करत आहेत, तुम्हाला सलाम, तुमच्या त्यागामुळेच भारत कोरोनाशी लढत आहे, एखाद्या सैनिकाप्रमाणे कर्तव्य निभावत आहात
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला नागरिकांनी संयम दाखवत खरी श्रद्धांजली दिली
  • अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात
  • भारतात कोरोना केस सापडण्याआधीच आपण परदेशी नागरिकांचे स्क्रीनिंग सुरु केले, शंभर केस होण्याआधीच परदेशी सीमा बंद केल्या, समस्या वाढण्याची वेळ पाहिली नाही, समस्या दिसताच ती थांबवण्याचा निर्णय घेतला
  • इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे
  • भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ, याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचं मोल नाही
  • राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांचं मोलाचं कार्य, कोरोना ज्या वेगाने वाढत आहे, त्याने आर्थिक तज्ज्ञही अवाक, लॉकडाऊन वाढवण्यात यावा हा उपाय वारंवार समोर येत आहे
  • भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात येत आहे
  • पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, कठोर पावलं उचलावी लागतील, नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं
  • 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, जे क्षेत्र आपलं हॉटस्पॉट वाढू देणार नाहीत, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार करू
  • सरकार उद्या विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांसाठी विशेष प्रयत्न
  • कोरोनाचे 10 हजार रुग्ण झाल्यावर 1500-1600 बेड्स असावे, असा जागतिक अनुभव, आपल्याकडे 2 लाख बेड्स आणि 600 कोविड रुग्णालये
  • युवा वैज्ञानिकांनो पुढे या, कोरोनावर लस शोधा

संबधित बातम्या :

तोंडावर ‘गमछा’ बांधून संबोधन सुरु, कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सप्तपदी’ 

PM Modi Live : संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा