नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 7 हजारपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. आज (11 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक (PM Narendra Modi Wear Mask) होत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मास्क लावून बसले आहेत.
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या (PM Narendra Modi Wear Mask) बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत मोदी स्वत: मास्क घालून बसले होते. विशेष म्हणजे त्यांनी घरगुती रुमालाने हा मास्क तयार केला आहे.
त्यामुळे ज्यांच्याकडे मास्क नाही ते घरातील स्वच्छ कापडाचा मास्क म्हणून वापर करु शकतात. तसेच घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरा, असा सल्लाही मोदींनी याद्वारे दिला आहे.
PM Shri @narendramodi wears a homemade face cover during a meeting with the Chief Ministers via video-conferencing over COVID-19. #WearFaceCoverStaySafe pic.twitter.com/t8n6Eh1Ick
— BJP (@BJP4India) April 11, 2020
एवढंच नव्हे तर राज्यातील सर्व मुख्यमंत्रीही मास्क लावून या बैठकीला उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या बैठकीदरम्यान मास्क घातला आहे.
पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढवायचा, काढायचा की प्रत्येक राज्यावर त्याचा निर्णय सोपवायचा याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. राज्यातील कोरोनाचा कहर पाहता, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अनुकूल असल्याचं कळतंय.
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली (PM Narendra Modi Wear Mask) आहे.