पुणेकरांसाठी खुशखबर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएल बस सेवा सुरु होणार

| Updated on: Aug 16, 2020 | 10:29 AM

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे (PMPL decide to start buses in Pune).

पुणेकरांसाठी खुशखबर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएल बस सेवा सुरु होणार
Follow us on

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे (PMPL decide to start buses in Pune). त्यामुळे तब्बल 5 महिन्यांनंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे. 22 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि पीएमपीएलच्या या निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना दळणवळणात मोठी मदत होणार आहे.

विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी याला तत्वतः मान्यताही दिली. त्यामुळे आता 22 ऑगस्टला पीएमपीएल बससेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमपीएल प्रशासनाने पुढील आठवड्यात बसेस सुरु होतील असं सांगितलं आहे. मात्र, निश्चित तारिख सांगितलेली नाही. तरीही गणेश चतुर्थीच्या दिवशी बसेसचा श्री गणेशा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बस सेवा ठप्प असल्याने पीएमपीएलला मोठा प्रमाणात आर्थिक फटका बसलाय. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासह देखभाल दुरुस्तीचा खर्चही आवाक्याबाहेर जात आहे. यासंदर्भात सोमवारी पुणे आणि मंगळवारी चिंचवड मनपा आयुक्त आणि पीएमपीएल प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या निर्णानुसार पहिल्या टप्प्यात साधारण 400 ते 450 बसेस शहरात सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर बस सेवा सुरु होतील.

नागरिकांच्या प्रतिसादानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात पीएमपीएल सुरु होईल. यामुळे आता सर्वसामान्य पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्सिंग सांभाळत मर्यादित प्रवाशांना परवानगी दिली जाणार आहे. बस दिवसातून 2-3 वेळा निर्जंतूक केली जाईल. प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात येणार आहे. पीएमपीला प्रतिदिन साधारण दीड कोटीपर्यंत उत्पन्न मिळतं. आतापर्यंत पीएमपीएलला साधारण 200 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

हेही वाचा :

Pune Dam | पुण्यातील चारही धरणात 79 टक्के पाणीसाठा, खडकवासाला धरण भरले

रांजणगावात ‘लिव्ह इन’ जोडप्यात वाद, प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीची हत्या

Pune Corona | कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार द्या, संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

व्हिडीओ पाहा :


PMPL decide to start buses in Pune