Lockdown : 67 दिवस PMPML बस सेवा बंद असल्याने 100 कोटींचे नुकसान

| Updated on: May 24, 2020 | 8:33 AM

लॉकडाऊनमुळे देशावर आर्थिक संकट आलं (PMPML Buses Loss) आहे. अशा परिस्थितीत आता पुणे महानगर परिवहन महामंडळावरही आर्थिक संकट आल्याचे दिसत आहे.

Lockdown : 67 दिवस PMPML बस सेवा बंद असल्याने 100 कोटींचे नुकसान
Follow us on

पुणे : लॉकडाऊनमुळे देशावर आर्थिक संकट आलं (PMPML Buses Loss) आहे. अशा परिस्थितीत आता पुणे महानगर परिवहन महामंडळावरही (पीएमपीएमएल) आर्थिक संकट आल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनचा फटका पीएमपीएमएल बस सेवेला बसला आहे. लॉकडाऊनमुळे पीएमपीएमएल बस सेवेला 100 कोटींचे नुकसान झाले आहे. पीएमपीएमएलची सेवा सलग 67 दिवस बंद होती. त्यामुळे हे नकुसान झाले (PMPML Buses Loss) आहे.

पीएमपीएमएलचे दररोजचे सरासरी उत्पन्न एक कोटी 60 लाखांपर्यंत होते. तर दरमहा 45 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पण 17 मार्चपासून पीएमपीएमएल सेवा बंद असल्यामुळे पीएमपीएमएल विभागाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील फक्त 100 बसेस सुरु आहेत.

अत्यावश्यक सेवेतील सुरु असलेल्या 100 बसेसमधून 60 दिवसात फक्त एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आता कर्माचाऱ्यांचे पगार, बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च कसा करावा, असा प्रश्न आता प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

नुकतेच पिंपरी-चिंचवड परिसरात पीएमपीएमएल बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काहीदिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेला राज्य सरकारने  रेड झोनमधून वगळले आहे. त्यामुळे या शहरावरील अनेक निर्बंध आता कमी झालेले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये किमान 15 मार्गांसाठी बस सेवा सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत पुन्हा PMPML बस धावणार, प्रवाशांसाठी नियम जाहीर

Corona | बससाठी आणखी 20 मिनिटं थांबा, पुण्यात PMPML बसच्या 584 फेऱ्या रद्द