शाळांमध्ये आता ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’, विद्यार्थ्यांच्या सरंक्षणासाठी प्रशासनाचा नवा उपक्रम

| Updated on: Jan 27, 2020 | 9:38 AM

पोलिसांच्या या उपक्रमाचे पालकांकडून तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून स्वागत (wardha police in school) होत आहे.

शाळांमध्ये आता पोलीस काका आणि पोलीस दीदी, विद्यार्थ्यांच्या सरंक्षणासाठी प्रशासनाचा नवा उपक्रम
Follow us on

वर्धा : महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत (wardha police in school) आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याकरिता पोलीस विभागाकडून ‘पोलीस काका, पोलीस दीदी’ हा उपक्रम सुरु केला आहे. यामुळे आता प्रत्येक शाळेत पोलिसांचा पहारा असणार आहे. तसेच या पोलिसांकडे विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारी यांच्याकडे करता येणार आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे पालकांकडून तसेच शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून स्वागत (wardha police in school) होत आहे.

लहान मुलं तसेच शाळकरी विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, रॅगिंग, छेडछाड, इतर गुन्हे रोखण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला. येत्या 1 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने नवीन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. पोलीस अधिक्षक डॉ बसवराज तेली यांनी या ‘पोलीस काका आणि पोलीस दिदी’ या फलकाचे अनावरण केलं.

या उपक्रमाअतंर्गत प्रत्येक शाळेत एक पोलीस पुरुष कर्मचारी म्हणजेच पोलीस काका आणि महिला कर्मचारी म्हणजेच पोलीस दिदी अशी दोघांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे दोन्ही पोलीस अधिकारी नेहमी शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणार आहेत. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला काहीही त्रास झाल्यास ते यांना संपर्क करुन त्यांना माहिती (wardha police in school) दिली.