मुंबई : सीबीआयच्या विनंतीनंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे (Police protection to Rhea Chakraborty). सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून रियाच्या घराबाहेर प्रचंड गर्दी होत आहे. रियाने याबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर सीबीआयने रियाचं घर ते डीआरडीओ गेस्ट हाऊस या प्रवासासाठी रियाला सुरक्षा देण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली होती. दरम्यान, रियाची शुक्रवारी (28 ऑगस्ट) 10 तास सीबीआय चौकशी झाली. आज पुन्हा तिची चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सिद्धार्थ पिठानीची बीकेसी ऑफिसला 12 तास चौकशी झाली.
LIVE Updates:
LIVE Updates : रिया घरातून डीआरडीओ कार्यलयाकडे निघाली, थोड्याच वेळात सीबीआय चौकशीसाठी पोहचणार, 28 ऑगस्टला रियाची 11 तास चौकशीhttps://t.co/WO2s51V83k#SushantSinghRajput pic.twitter.com/udS70hLQIe
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2020
सीबीआय सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलने रियाची चौकशी करण्याची शक्यता आहे. रियाने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांत विमानाची भीती वाटत असल्याने विमानात बसण्याआधी मोडाफीन औषध घ्यायचा असं म्हटलं होतं. तिने स्वतः ड्रग्जचं सेवन कधीच केलं नाही, असंही तिने सांगितलं होतं. रिया सुशांतसोबत एप्रिल 2019 ते 8 जून 2020 या कालावधीत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र ज्यांच्यावर ड्रग्ज तस्करीचा आरोप झालाय त्यांच्यासोबत ती 2017 पासून संपर्कात असल्याचं समोर आलंय. रियाच्या चॅटमुळे ड्रग्जचा संशय बळावल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, सुशांत प्रकरणी रिया चक्रवर्तीची सीबीआय चौकशी सुरु असतानाच तिच्या घराबाहेर माध्यमांचा मोठा गराडा पडला आहे. याआधी एकदा तेथे गर्दीमुळे गोंधळही उडाला होता. रियाने याचा व्हिडीओ पोस्ट करत आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी काळजीही व्यक्त केली होती. त्याचपार्श्वभूमीवर सीबीआयने रियाला तिच्या घरापासून डीआरडीओ गेस्ट हाऊसपर्यंत पोलीस संरक्षण देण्याची विनंती मुंबई पोलिसांना केली.
यानंतर मुंबई पोलीस रियाला देणार सुरक्षा आहे. सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिया आणि तिच्या कुटुंबाला घरापासून डीआरडीओ गेस्ट हाऊसपर्यंत सांताक्रुझ पोलीस सुरक्षा देणार आहेत. सांताक्रूझच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. अद्याप मुंबई पोलीस रियाच्या घरी पोहोचलेले नाहीत. पोलीस येताच रिया सीबीआय चौकशीसाठी डीआरडीओला निघणार आहे.
अर्णव गोस्वामी आणि भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा : अनिल गोटे
दरम्यान, धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सुशांत सिंह प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी अर्णव गोस्वामी आणि अन्य भाजप नेत्यांच्या विरुध्द सुशांत प्रकरणात पुरावे लपवुन ठेवल्याचा आरोप केला आहे. तसेच तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अर्णव गोस्वामी आणि भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत आईस्क्रीम विक्री, मीडिया हाऊस ते चित्रपट निर्मिती, सुशांत प्रकरणाशी संदीप सिंहचा संबंध काय?
Rhea Chakraborty | सुशांतला मानसिक आजार, तो नेहमी मॅरिजुआना ड्रग्ज घ्यायचा – रिया चक्रवर्ती
CBI Inquiry | आठव्या दिवशी रियाचा सीबीआयशी सामना, चौकशीत नेमकं काय झालं?
Police protection to Rhea Chakraborty