कमी दिवसात जास्तीत जास्त पैशांचा परतावा मिळतो म्हणून सर्वसामान्य आपल्याकडील जमापुंजी असा कंपन्यात गुंतवित असतात. अशा योजनांमधून हजारो कोटींचा पैसा जमा केल्यानंतर कंपन्यांना गाशा गुंडाळून पाबोरा करीत असतात. आता मुंबई आणि परिसरातील टोरेस ज्वेलर्स कंपनीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. लोकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या कंपनीत गुंतविली होती. त्यानंतर कंपनीने आपली कार्यालये बंद केल्याने लोकांचे धाबे दणाणले आहेत. टोरेस ही काही पहिली कंपनी नाही. आतापर्यंत दोनशेहून अधिक पाँझी स्कीम्स कंपन्या बंद पडल्या आहेत. लोक अशा कंपन्यांत बिनधास्तपणे गुंतवित असतात. त्यानंतर या कंपन्या बंद पडतात. पोलिस तोंड देखली कारवाई करतात. परंतू लोकांचे बुडालेले पैसे काही मिळत नाहीत. काय आहे हा घोटाळा पाहूयात…..
टोरेस ज्वेलर्सचे मुंबई आणि परिसरात एकूण सहा आलिशान शोरूम होते. दादर, ग्रँट रोड, कांदिवली,सानपाडा, मीरा रोड, कल्याण येथे कंपनीची शोरुम आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपनीची सुरुवात झाली. मुंबईत या कंपनीची शोरुम उघडण्यात आल्याने लोकांना विश्वास बसला. तसेच आठवड्यात परतावा मिळत असल्याने सुरुवातीला हप्ते वेळेवर जमा होत असल्याने लोकांनी आशेने अधिकाधिक रक्कम या कंपनीत गुंतवली,त्यानंतर कंपनीला परतावा देणे शक्य न झाल्याने कंपनीने गाशा गुंडाळला. या प्रकरणात आर्थिक लुबाडणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी या कंपनीने नेमके काय आमीष दाखविले याची माहिती दिली आहे. टोरेसने सुरुवातीला मोठ्या शहरात आपले सेमिनार घेतले. त्यातून गुंतवणूकदारांना भल्यामोठ्या परताव्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
आपल्या देशात लोकांना अर्थभान किंवा आर्थिक समज कमी आहे. अशिक्षित नव्हे तर सुशिक्षित लोकांत ही समजूत कमी आहे. सरकारी, खाजगी बँका का बंद पडत असतात. लोकांची जमापुंजी या बँकामध्ये जादा व्याज मिळत असल्याने गुंतविली जाते. परंतू जादा व्याज मिळणे काही दिवसांनी बंद होते. मागे गडकरी रंगायतन येथेही एका ज्वेलरी शॉपने अशा प्रकारे लोकांकडून पैसे स्वीकारुन फसवणूक केली होती. डीस कुलकर्णी कंपनीने हाऊसिंगसाठी लोकांकडून पैसे घेतले आणि लोकांची फसवणूक केली. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला देखील पुरेसे ज्ञान आहे की नाही याबद्दल शंका आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक केली जाते, नंतर त्यांना जामीन मिळतो. त्यानंतर पुन्हा हेच लोक हेच घोटाळे नव्या जोमाने करीत असतात. मालमत्तेवर टाच आणली तरी दोन ते तीन कोटींची मालमत्ता जप्त होते. परंतू फसवणूक आठ कोटींची झालेली आहे. त्यामुले अनेक वर्षांनी काही मोजक्यांना पैसे मिळतील त्यास काही अर्थ रहात नाही. या अशा पाँझी स्कीम्समध्ये अडकलेले लोकांचे पैसे काही परत मिळत नाहीत असे अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले.
या सेबी कायद्यांतर्गत देखील या कंपन्यांवर अंकुश लावण्यात येतो. या सामुदायिक गुंतवणूक स्कीमविषयी (कलेक्टीव्ह इनव्हेसमेंट स्कीम ) सेबीने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात २००८ रोजी कायद्यात तरतूद केल्यानंतर २०० कंपन्या बंद पडल्या होत्या. यात सहारा, पॅनकार्ड, एसएलए सारख्या सहाशे कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. आपले कायदे कच्चे आहेत.सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी अंतगर्त या कंपन्यांची नोंदणी केली जाते. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा आरोपींना अटक करते आणि खटला चालवून शिक्षा देखील होते. या कंपन्याची मालमत्तेवर टाच देखील आणली जाते. परंतू संपत्ती एक दोन कोटींची असते. तर घोटाळ आठ ते दहा कोटींचा असतो. त्यामुळे पैसे परत मिळत नाहीत लोक आपल्या आयुष्याची कमाई गमावून बसतात. आतापर्यंत २०० कंपन्यांचे आठ हजार कोटी ते दोन लाख कोटी रुपये अडकलेले आहेत. २५ वर्षे झाले तरी हा पैसा मिळालेला नाही असे अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटले आहे.
टोरेस ज्वेलर्स कंपनीने चार प्रकारच्या योजना बाजारात आणल्या होत्या. पहिली दर आठवड्याला दोन टक्के व्याज परताव्यासह सोन्यात गुंतवणूक, ३ टक्के व्याज परताव्यासह चांगी योजनेत गुंतवणूक, चार टक्के व्याज परताव्यासह मेझेनाईट स्टोनमध्ये गुंतवणूक आणि मोझेनाईट खड्यात गुंतवणूक केल्यास पाचे ते सहा टक्के व्याज मिळेल असे आमीष दाखविण्यात आले होते.
आपल्याला या योजनेची माहिती आमच्या शेजाऱ्यांनी दिली. त्यांनी आपले पासबुक दाखवून पैशाची एन्ट्री दाखविली, तसेच ही कंपनी आठवड्याला परतावा देत होती. आणि जास्त वाट पाहण्याची गरज नव्हती. तसेच कंपनी आपली कार्यालये उघडत चालली होती. म्हणजे दोन ते तीन वर्षे कंपनी बंद पडणार नाही असे वाटले. शिवाय दोन ते तीन हप्ते वेळेवर आल्याने माझा विश्वास बसला भाजीच्या धंद्यात रेस्टॉरंटवाले उधारी ठेवायचे त्यामुळे फायदा होत नव्हता आणि कंपनी वेळेवर पैसा देत असल्याने विश्वास वाटल्याने मी लोन काढून कंपनीत पैसे गुंतवले असे चार कोटीची गुंतवणूक करणाऱ्या भाजीवाल्याने म्हटले आहे.
कंपनीनं प्रामुख्यानं चार प्रकारच्या योजना आम्हाला सांगितल्या. त्यानुसार पहिली दर आठवड्याला २ टक्के व्याज परताव्यासह सोन्यात गुंतवणूक, ३ टक्के व्याज परताव्यासह चांगीमध्ये गुंतवणूक, ४ टक्के व्याज परताव्यासह मेझेनाईट स्टोनमध्ये गुंतवणूक आणि फक्त मोझेनाईट खड्यांमध्ये गुंतवणूक केल्यास ५ ते ६ टक्के व्याजदर परतावा मिळेल असं सांगण्यात आलं”, अशी माहिती शिवडीतील एक गुंतवणूकदार गीता गुप्ता यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. गीता गुप्ता यांचं या घोटाळ्यात १५ लाखांचं नुकसान झालं आहे.
अशा आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना पाँझी स्कीम्स का म्हटले जाते ? असा सवाल तुमच्या मनात नक्की आला असेल. १८८२ मध्ये इटलीत जन्मलेल्या चार्ल्स पाँझी याने अशा प्रकारे घोटाळा केला होता. कमी काळात जास्त व्याज देणारी गुंतवणूक योजना त्याने आणली होती. या कंपनीत अनेक लोकांचे पैसे बुडाले. हा काही पहिला घोटाळा नव्हता. परंतू हा घोटाळा खूप गाजल्याने अशा प्रकारच्या स्कीम्सना आपसूक पाँझी स्कीम्स असे नावच पडले.
आर्थिक गुंतवणूक करताना कंपनी या गुंतवणूकदारांना आणखी गुंतवणूकदारांना आणल्यास कमिशन देण्याचे आमीष दाखवते. आणि सुरुवातीला लोकांना वेळेवर पैसे मिळाल्याने या योजनांची तोंडी प्रचार आपोआप होतो. त्यानंतर जुन्या लोकांना नवी लोकांचा पैसा पुरविला जातो. नंतर नवीन ग्राहक न मिळाल्यास हे चेन मार्केटिंग साखळी कुठे ना कुठे तुटते आणि हा पिरामिड कोसळलतो अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. अशाच प्रकारे दाम दुप्पट करुन देणार बेस्टमधील शेरेगर घोटाळा नव्वदच्या दशकात गाजला होता. संचयनी, कल्पवृक्ष, पॅनकार्ड अशा गुंतवणूक कंपन्यांचे अनेक प्रकारचे घोटाळे उघडकीस आले आहे. गुंतवणूकदारांनी त्यांचा पैसा मिळण्याची आशाही सोडून दिली आहे.