लिस्बन : पोर्तुगालमध्ये एका आरोग्य कर्मचारी (Portuguese health worker) महिलेचा Pfizer कंपनीची कोरोनावरील लस घेतल्यानंतर ( Pfizer Corona Vaccine) 48 तासांत मृत्यू झाला आहे. सोनिया असेवेडो (Sonia Acevedo) असं या महिलेचं नाव असून ती 41 वर्षांची होती. दरम्यान लस घेतल्यानंतर तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट्स दिसून आले नव्हते. अचानक तिचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Portuguese Health worker dies in 48 hours after getting the pfizer covid vaccine)
या मृत्यूप्रकरणी सोनिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले गेले असून तिच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान ब्रिटन आणि फिनलँडमध्येदेखील अमेरिकन औषध कंपनी फायझरच्या कोरोनावरील लसीमुळे साईड इफेक्ट्स झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
डेली मेलने यबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार सोनिया या पोर्तो शहरातील पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये कार्यरत होत्या. त्यांना यापूर्वी कोणताही आजार झाला नव्हता किंवा त्यांना कोणत्याही आजाराचे साईड इफेक्ट्सही (दुष्परिणाम) झाल्याचे त्यांच्या आरोग्यासंदर्भातील जुन्या अहवालांमध्ये (मेडिकल हिस्ट्री) नमूद करण्यात आलेलं नाही. सोनिया यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती.
सोनिया यांचे वडील अबिलियो असेवेडो यांनी पोर्तुगालमधील एका वृत्तपत्राला (पोर्तुगाल डेली) मुलीच्या मृत्यूनंतर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “माझी मुलगी अगदी ठणठणीत होती. तिला कोणताही आजार नव्हता. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. केवळ कोरोनावरील लसीकरणासाठी स्वयंसेवक म्हणून तिला कोरोनाची लस देण्यात आली होती. तिच्या मृत्यूपूर्वी एक दिवस आधी तिला ही लस देण्यात आली होती”.
अबिलियो असेवेडो म्हणाले की, “सोनियाला अचानक काय झालं हे मला माहीत नाही. तिचा मृत्यू कशामुळे झाला याचं उत्तर मला मिळालंच पाहीजे. लस बनवणारी कंपनी असेल अथवा ज्या संस्थेने तिला लस दिली यांनी मला तिच्या मृत्यूचं कारण सांगायला हवं. सोनियाला दोन लहान मुलं आहेत. त्यांचा विचार कोण करणार?”
पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीने एक पत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, सोनियाला 30 डिसेंबर रोजी लस देण्यात आली होती आणि तिचा 1 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. सोनियामध्ये लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स (दुष्परिणाम) दिसून आले नव्हते, असं पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. सोनियाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास केला जात असून शवविच्छेदनाच्या अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. त्यातून कोणती माहिती समोर येते, याकडे तिच्या कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, फिनलँडनंतर आता बुल्गेरियामध्येदेखील अमेरिकन औषध कंपनी फायझरच्या कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. ड्रग एजन्सीचे कार्यकारी संचालक बॉग्डन किरिलोव्ह म्हणाले की, आतापर्यंत चार जणांमध्ये या लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. त्यापैकी दोन रुग्णांना अंगदुखीचा त्रास होतोय तर दोघांना ताप येतोय.
यापूर्वी फिनलँडमध्ये फायझर कंपनीची लस घेतलेल्या पाच जणांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत. तर ब्रिटनमध्ये दोन आरोग्य कर्मचार्यांमध्ये या लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यानंतर फायझर कंपनीने जगभरात अॅलर्जी असलेल्या रूग्णांसाठी कोरोना लस वापरण्यासंबंधी काही माहितीही जारी केली होती. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आपत्कालीन वापरासाठी फायझरच्या लसीला मान्यता दिली आहे.
हेही वाचा
इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन, बोरिस जॉन्सन यांची घोषणा
वटवाघूळ-उंदीर खाणाऱ्या चीनचा कानाला खडा; कोरोनाच्या भीतीने शाकाहाराकडे वाटचाल?
(Portuguese Health worker dies in 48 hours after getting the pfizer covid vaccine)