अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरातील पोलीस कार्टरजवळ गोळीबार (tushar pundkar Died) झाला. यात तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान हा गोळीबार कोणी केला याबाबत सध्या तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 10.30 च्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरातल्या पोलीस कॉर्टरजवळ अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात पुंडकर गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला शहरातल्या आयकॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समजताच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे अकोटकडे रवाना झाले. मध्यरात्री 2.51 च्या दरम्यान पुंडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
पुंडकर यांच्यावर हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या गोळीबाराचा तपास अकोट पोलिसांकडून सुरु (tushar pundkar Died) आहे.
कोण आहेत तुषार पुंडकर?