मंत्रालयाबाहेर अंधारातच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा ‘जनता दरबार’

| Updated on: Oct 16, 2020 | 2:02 PM

"सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक झाली की मनाला समाधान मिळते. शेवटी ते आहेत म्हणून आपण आहोत" अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली.

मंत्रालयाबाहेर अंधारातच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा जनता दरबार
Follow us on

मुंबई : मंत्रिमंडळ बैठक संपण्यास उशीर झाल्याने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रालयाबाहेर अंधारातच लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं. तनपुरेंच्या कार्यतत्परतेबद्दल जनतेने समाधान व्यक्त केलं आहे. (Prajakt Tanpure Janta Darbar in Dark outside Mantralaya)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना ‘जनता दरबार’ हा उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात मंत्री जनतेच्या समस्या ऐकून सोडवण्यावर भर देतात.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्राजक्त तनपुरे यांना वेळेत जनता दरबाराला पोहोचता आले नाही. त्यामुळे जनतेला माघारी पाठवण्याऐवजी त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर अंधारातच आलेल्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

प्राजक्त तनपुरे बुधवारी दुपारी चार ते सहा या वेळेत जनता दरबार घेतात. मात्र आपल्याला उशीर झाल्यामुळे लोकांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी आपले मंत्रालयीन कामकाज संपताच मंत्रालयाबाहेरील परिसरात, भरअंधारात लोकांची भेट घेतली.

“सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक झाली की मनाला समाधान मिळते. शेवटी ते आहेत म्हणून आपण आहोत” अशी भावना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता दरबार

राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड दुपारी 2 ते 4 या वेळेत, तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेतात. (Prajakt Tanpure Janta Darbar in Dark outside Mantralaya)

मंगळवारी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ सकाळी 10 ते 12, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दुपारी 2 ते 4 तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेतात.

बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे 10 ते 12, मंत्री दत्तात्रय भरणे दुपारी 2 ते 4 तर मंत्री प्राजक्त तनपुरे संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेतात.

गुरुवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सकाळी 10 ते 12, दुपारी 2 ते 4 या वेळेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तर मंत्री दिलीप वळसे पाटील संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत जनता दरबार घेतात.

शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी 10 ते 12, मंत्री आदिती तटकरे दुपारी 2 ते 4 आणि मंत्री संजय बनसोडे संध्याकाळी 4 ते 6 यावेळेत जनता दरबार घेतात.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता दरबार, आव्हाड सोमवारी, अजितदादांच्या भेटीचा दिवस कोणता?

(Prajakt Tanpure Janta Darbar in Dark outside Mantralaya)