मुंबई : “जे मराठा समाजाला दिलं जात आहे, तसे लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत. मात्र OBC मधून त्यांना आरक्षण नको,” अशी भूमिका माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केले जाणार आहे. यावेळी ओबीसी समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल, असे प्रकाश शेंडगे म्हणाले. (Prakash Shendge On OBC And Maratha Reservation Issue)
“ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी काही नेते करत आहेत. या मागणीमुळे ओबीसी समाजात जे छोटे समाज ते भयभीत झाले आहेत. त्यामुळे हे सर्व चुकीचे सुरू आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात वाद निर्माण केला जात आहे,” असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले.
“त्या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन केलं जाणार आहे. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात येणार असून त्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर पुढच्या टप्पातील आंदोलन हे तहसीलदार कार्यालय समोर केले जाईल, ज्याची तारीखनंतर जाहीर केली जाईल,” असेही प्रकाश शेंडगेंनी सांगितले.
तसेच मराठा समाजाला जे लाभ दिलं जात आहे, ते आणि तसेच लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत, अशीही आमची मागणी आहे. त्याशिवाय राज्यात सद्यस्थितीत सुरु असलेली मेगाभरती थांबवली पाहिजे, अशीही आमची मागणी आहे. आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत. ओबीसीला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमी केली आहे, असेही प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले.
दरम्यान सर्वांचे आरक्षण रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण देण्याची मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उद्विग्न भावनेतून केली असावी, असे मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले होतं. राज्यातील मागासवर्गीय समाज व बारा बलुतेदारांचा जीवनासाठी संघर्ष अजूनही सुरुच आहे. त्यामुळे आरक्षण रद्द करुन चालणार नाही, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले होते. (Prakash Shendge On OBC And Maratha Reservation Issue)
संबंधित बातम्या :
धनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा
मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द