अनिल देशमुख, तुम्ही पुढाऱ्यासारखं बोलू नका, तुम्ही तर गृहमंत्री : प्रवीण दरेकर

| Updated on: Oct 06, 2020 | 4:30 PM

राज्याचे गृहमंत्री एखाद्या राजकीय पक्षाचे पुढारी असल्यासारखी वक्तव्य करत आहेत, अशी टीका करत अनिल देशमुखांनी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम करावं, महाविकास आघाडीचा नेता म्हणून नाही, असा सल्ला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. (Pravin Darekar Criticized Anil Deshmukh Over Sushant Sinh Rajput Case) 

अनिल देशमुख, तुम्ही पुढाऱ्यासारखं बोलू नका, तुम्ही तर गृहमंत्री : प्रवीण दरेकर
Follow us on

पुणे : सुशांतसिंह प्रकरणात भाजपने माफी मागण्याचा काहीही संबंध नाही. सुशांत प्रकरणाचा सीबीआय रिपोर्ट आणखी आला नाही, मग गृहमंत्री अनिल देशमुख यांना एवढी घाई का झालीय?, असा सवाल करत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांना असं वर्तन शोभत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (Pravin Darekar Criticized Anil Deshmukh Over Sushant Sinh Rajput Case)

एम्सचा रिपोर्ट आल्यापासून सुशांत सिंह प्रकरणात महाविकास आघाडीचे नेते भाजपवर जोरदार शरसंधान साधत आहेत. तसंच मुंबई-महाराष्ट्राची भाजपने बदनामी केलीये. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्यावर सुशांतसिंह प्रकरणात भाजपने माफी मागण्याचा काहीही संबंध नाही. सुशांत प्रकरणाचा सीबीआय रिपोर्ट आणखी आला नाही. गृहमंत्री महोदयांनी कसलीही घाई करु नये, असं दरेकर म्हणाले.

राज्याचे गृहमंत्री एखाद्या राजकीय पक्षाचे पुढारी असल्यासारखी वक्तव्य करत आहेत, अशी टीका करत अनिल देशमुखांनी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम करावं, महाविकास आघाडीचा नेता म्हणून नाही, असा सल्ला दरेकरांनी दिला. हाथरससारखे प्रकार रोज राज्यात होतायत. कोरोना, शेतकरी यांचे प्रश्न आ वासून उभा आहेत, त्यावर गृहमंत्री का बोलत नाही?, असा सवाल दरेकरांनी गृहमंत्र्यांना विचारला.

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंट्स उघडले गेले या आरोपावर बोलताना, “सगळेच फेक अकाऊंट्स चेक करा. तसंच ती अकाऊंट्स कुणाचीही असो त्यावर कारवाई करा, असं दरेकर म्हणाले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अश्लील ट्रोल केले जाते, त्यावर सायबर क्राईम का कारवाई करत नाहीत? असा सवाल देखील दरेकर यांनी उपस्थित केला. तसंच मुंबई पोलिस हे कुठल्या पक्षाचे नाहीत, मुंबई पोलिसांची आम्हाला पण काळजी आहे, असं दरेकर म्हणाले.

ड्रग्ज माफियांच्या रॅकेट मध्ये सरकारच्या जवळचे लोक अडकलेत, असा गंभीर आरोप करत त्यांना वाचविण्यासाठी अशी वक्तव्य केली जातायेत, असा गंभीर आरोपही दरेकरांनी केला. तसंच प्रत्येक गोष्ट भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर उलटवण्याची नियोजनबद्ध खेळी खेळली जात आहे, असा आरोप दरेकरांनी केला.

दरेकरांनी मंत्री उदय सामंत यांच्यावरही हल्लाबोल केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मीडियाच्या माध्यमातून मोठं मोठ्या गप्पा मारतात. मात्र परीक्षांचे कुठलेच नियोजन नाही. विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतोय, या सगळ्या प्रकाराला सरकार जबाबदार आहे, असं दरेकर म्हणाले. (Pravin Darekar Criticized Anil Deshmukh Over Sushant Sinh Rajput Case)

संबंधित बातम्या

घरात किंवा मंत्रालयात बसून बैठका घेणाऱ्यांना काहीच कळणार नाही, प्रवीण दरेकरांचा टोला

शेतकऱ्यांच्या परिस्थितीस ठाकरे सरकार जबाबदार; विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका

उत्तर प्रदेशातील घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण; दरेकरांचा आरोप