औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. त्याचबरोबर बागायती जमिनीसाठी 50 हजार आणि कोरडवाहू जमिनीसाठी 25 हजार हेक्टरी मदत द्या, अशी मागणी दरेकरांनी केली. (Pravin Darekar Demand Declare Wet Draught In marathwada)
प्रवीण दरेकर आज मराठवाडा दौऱ्यावर होते. मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाची त्यांनी पाहणी केली. फुलंब्री, खुलताबाद, औरंगाबाद, कन्नड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली.
“शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यांची परिस्थिती गंभीर आहे. पण या सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. किंबहुना हे सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घेत नाही. सरकारकडून फक्त पत्रव्यवहार सुरू आहे”, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.
शासनाची पूर्ण फोर्स वापरून तातडीने पंचनामे पूर्ण करा. तसंच पीक विम्याचे क्लेम तातडीने मंजूर करा, अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या. जर शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही तर भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना सोबत घेऊन टोकाचा संघर्ष करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रवीण दरेकर म्हणाले, “मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याचबरोबर बागायती जमिनीसाठी 50 हजार आणि कोरडवाहू जमिनीसाठी 25 हजार हेक्टरी मदत द्या. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यांची परिस्थिती गंभीर आहे.
पण या सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. किंबहुना हे सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घेत नाही. सरकारकडून फक्त पत्रव्यवहार सुरू आहे. शासनाची पूर्ण फोर्स वापरून तातडीने पंचनामे पूर्ण करा. तसंच पीक विम्याचे क्लेम तातडीने मंजूर करा. जर शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही तर भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना सोबत घेऊन टोकाचा संघर्ष करणार.”
(Pravin Darekar Demand Declare Wet Draught In marathwada)
संबंधित बातम्या
‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर