लखनऊ: उत्तर प्रदेशातील संगम नगरी प्रयागराज इथं कुंभमेळ्याला (Kumbh Mela) सुरुवात होत आहे. मात्र त्यापूर्वी आज भीषण दुर्घटना घडली. कुंभमेळ्यातील दिगंबर आखाड्याच्या तंबूत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत 12 तंबू जळून खाक झाले. आगीमुळे साधू संतांचं साहित्याची राख झाली. मात्र सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या असंख्य गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
Prayagraj: Fire breaks out at a camp of Digambar Akhada at #KumbhMela pic.twitter.com/yq0yO7jr4i
— ANI UP (@ANINewsUP) January 14, 2019
मंगळवारी म्हणजेच उद्याच्या पहिल्या शाही स्नानासाठी असंख्य भाविक प्रयागराज इथं दाखल झाले आहेत. जगविख्यात कुंभमेळा 15 जानेवारी ते 4 मार्चदरम्यान चालणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावरील प्रयागराज शहर हे चार स्थानांपैकी एक आहे. त्यामुळे कुंभ 2019 चं आयोजन प्रयागराज इथं करण्यात आलं आहे. कुंभ 2019 चा भव्य उत्सव बनवण्यासाठी यूपी सरकारने जय्यत तयारी केली आहे.
Prayagraj: Fire fighting operations underway at a camp of Digambar Akhada at #KumbhMela; NDRF personnel also present at the site pic.twitter.com/XwVkZviG9e
— ANI UP (@ANINewsUP) January 14, 2019
टीव्ही 9 मराठीची टीमही प्रयागराज इथं पोहोचली आहे. कुंभमेळ्याची बित्तंबातमी तुम्ही टीव्ही 9 मराठीवर, टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तसंच सोशल मीडियावर पाहू शकाल. कुंभ 2019 चं मुख्य आकर्षण, पवित्र स्नानाचा मुहूर्त यासासह अन्य महत्त्वाच्या बाबी तुम्हाला टीव्ही 9 वर पाहायला मिळतील.