Diwali 2020 : अयोध्येचा दीपोत्सव, 5 लाख 51 हजार दिव्यांनी अयोध्या उजळणार
यंदाही अयोध्येत दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. अयोध्येत 5 लाख 51 हजार दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे. (Ayodhya Diwali Festival Deepotsav 2020 )
-
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही अयोध्येत दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. आज अयोध्येत 5 लाख 51 हजार दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामुळे अयोध्या पुन्हा एकदा स्वत: केलेला रेकॉर्ड पुन्हा मोडणार आहे.
-
-
दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशीदिवशी अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अयोध्येत आज उत्साहपूर्ण वातावरण आहे.
-
-
अयोध्येतील दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातील नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. या भव्य दीपोत्सवाच्या निमित्ताने अयोध्येचे रुपडं पालटलं आहे.
-
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दीपोत्सवात मर्यादित संख्येतच लोकांना सहभागी होता येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र तरीही अनेक भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे.
-
-
अयोध्येत आज साकेत महाविद्यालयापासून 11 रथांची एकत्रित यात्रा काढली जाणार आहे. या रथ यात्रेद्वारे श्रीरामांच्या जीवनावर आधारित विविध प्रदर्शन केले जाणार आहे.
-
-
दुपारी 3 वाजता उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत दाखल होतील. त्यानंतर ते राम जन्मभूमीत जात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतील.
-
-
त्यानंतर योगी आदित्यनाथांच्या हस्ते राम जन्मभूमीत दीपाचे प्रज्वलन होईल. या ठिकाणी 11 हजार दिवे प्रज्वलित केली जातील.
-
-
यानंतर संध्याकाळी 4 वाजता योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल एकत्र राम कथा पार्क या परिसरात जातील. त्या ठिकाणी आरती केली जाईल.
-
-
संध्याकाळी 6.15 वाजता दीपोत्सवाला प्रारंभ होईल. यावेळी 5 लाख 51 हजार दिवे प्रज्वलित केले जातील. याची गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे.
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो