लोकसभा 2024 च्या निवडणूकांचा निकाल लागला आहे. एनडीएला बहुमत मिळाल्याने भाजपाप्रणित सरकार विराजमान झाले आहे. रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लागोपाठ तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला मिळणाऱ्या सुविधा आणि वेतन खास असते. त्यांना सरकारी निवासस्थान आणि एसपीजीची सुरक्षा मिळते. परंतू तुम्हाला माहीती आहे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि चिफ जस्टीस ऑफ इंडिया यांच्यापैकी कोणाला जास्त वेतन आणि सुविधा मिळतात.
पीएम नरेंद्र मोदी यांना लागोपाट तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेता आली आहे. त्यांच्या आधी सलग तीन वेळा केवळ पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले होते. पंतप्रधान पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. परंतू त्यांना मिळणाऱ्या सुविधा देखील खास असतात. त्यांना अधिकृत सरकारी निवासस्थान असते. परदेश प्रवासात त्यांच्या राहण्याचा खर्च आणि इतर सर्व खर्च सरकार करते. परंतू देशाच्या पंतप्रधानांना किती वेतन असते ? त्यांचे वेतन राष्ट्रपती किंवा चिफ जस्टीस ऑफ इंडिया यांच्याहून जास्त असते की कमी असते ? चला तर जाणून घेऊयात…
देशाच्या पंतप्रधानांना दर महिन्याला 1.66 लाख रुपये वेतन म्हणून दिले जाते. यात 50 हजार रुपए बेसिक वेतन असते. तर 3 हजार रुपए खर्चासाठी भत्त्यांच्या स्वरुपात मिळतात. तर 45 हजार रुपयांचा संसदीय भत्ता मिळतो. याशिवाय त्यांना 2 हजार रुपयांचा दैनिक भत्ता देखील दिला जातो.
भारतात पंतप्रधानांना ते पदावर असे पर्यंत सोयी सुविधा दिल्या जातात. परंतू पद सोडल्यानंतर देखील त्यांना काही सोयी आणि सुविधा माजी पंतप्रधान म्हणूक कायम मिळतात. पहली पाच वर्षे माजी पंतप्रधानांना सरकारी घर मिळते. वीज, पाणी आणि एसपीजीची सुरक्षा मिळते. दिल्लीत उच्चभ्रू अशा ल्युटियंस झोन मध्ये आजीवन मुफ्त निवास, आजीवन नि:शुल्क आरोग्य सुविधा आणि पद सोडल्यानंतरही पाच वर्षांपर्यंत 14 लोकांचा सेक्रेटरी स्टाफ देखील सेवेसाठी मिळतो.
भारताच्या राष्ट्रपतींना अनेक अधिकार असतात. ते तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख असतात. त्यांच्याजवळ पंतप्रधानासह अनेक पदांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतात. तसेच संसदेचे अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार त्यांना असतो. तसेच संसदेचे अधिवेशन बोलाविण्याबरोबरच ते स्थगित करण्याचा देखील अधिकार असतो. राष्ट्रपतींना वेतनासह अनेक भत्ते मिळत असतात. देशाच्या पंतप्रधानांना दर महिन्याला 5 लाख रुपये वेतन दिले जाते. याशिवाय अनेक भत्ते दिले जातात. त्यांच्यावर कोणताही कर नसतो.
त्यांना जगभर ट्रेन आणि विमानातून मोफत प्रवास करण्याचा अधिकार असतो. त्यांना आरोग्य सुविधा आणि कार्यालयाचा खर्च देखील दिला जातो. कार्यालयीन खर्चासाठी त्यांना दरवर्षी 1 लाख रुपए दिले जातात. पदावरुन निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना दर महिन्याला 1.5 लाख रुपये पेंशन दिली जाते. त्याशिवाय मोफत सरकारी घर, दो फ्री लॅंडलाइन फोन, एक मोबाइल फोन आणि पाच खाजगी कर्मचारी दिले जातात.
देशाच्या विधी आणि न्याय विभागाने दिलेल्या माहीतीनूसार देशाच्या सर्वौच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांना दर महिन्याला 2,80,000 रुपयांचे वेतन दिले जाते. पद सोडल्यानंतर माजी सरन्यायाधीशांना 16,80,000 रुपये वार्षिक पेन्शन म्हणून दिले जातात. त्यासोबत भत्ता देखील दिला जातो. माजी चिफ जस्टीस ऑफ इंडिया पदावरील व्यक्तीला एकरकमी 20 लाख रुपए ग्रॅच्युईटी म्हणून दिली जाते.
रिटायरमेंट नंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय सिव्हील सर्व्हीस क्लास वन ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या मेडीकल सुविधा आणि संरक्षण मिळते. तर, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना 2.50 लाख रुपये मासिक वेतन आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना दर महिन्याला 2.50 लाख रुपये वेतन मिळते. तर हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना दर महिन्यास 2.25 लाख रुपये वेतन मिळते.