Atal Tunnel : पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन

| Updated on: Oct 03, 2020 | 11:07 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिमाचल प्रदेशमधील रोहतांग येथील अटल बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले.

Atal Tunnel : पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन
Follow us on

शिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी हिमाचल प्रदेशमधल्या रोहतांग येथील अटल बोगद्याचे (Atal Tunnel) उद्घाटन करण्यात आले. यासाठी पंतप्रधान मोदी सकाळीच मनाली येथे दाखल झाले होते. बोगद्याच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरदेखील यावेळी उपस्थित होते. (Prime Minister Narendra Modi inaugurates Atal Tunnel at Rohtang)

हिमालयाच्या दुर्गम पर्वरांगांमधील डोंगर खोदून हा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 3,060 मीटर उंचीवर आहे. रोहतांग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी 474 किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते. अटल बोगद्यामुळे हे अंतर 428 किलोमीटर इतके झाले आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) तयार केला आहे.

दरम्यान, बोगद्याच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. तसेच मोदींनी यात म्हटले आहे की, हा बोगदा या परिसरातील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवणार आहे.

अटल बोगद्याची वैशिष्ट्ये

1. अटल बोगदा हिमाचलमधील मनाली ते लेहला जोडतो
2. बोगद्याची लांबी तब्बल 9.2 किमी असून हा जगातला सर्वात लांब बोगदा आहे.
3. बोगद्यामुळे मनाली ते लेह दरम्यानचं अंतर तब्बल 46 किमीने कमी होणार आहे.
4. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळं लाहुल स्पिती व्हॅलीचा संपर्क इतर जगाशी तुटायचा, परंतु आता या बोगद्यामुळे लाहुल स्पिती जगाच्या मुख्य प्रवाहात येईल.
5. बोगद्यातून दिवसाला 3 हजार कार आणि 1.5 हजार ट्रक ये-जा करतील.
6. बोगद्यातून 80 किमीच्या कमाल वेगानं वाहन चालवता येईल.
7. अग्निशमन दल, सुरक्षा दल आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतील
8. दर 150 मीटरला टेलिफोन, आणि 60 मीटरवर अग्निरोधक उपकरणे आहेत
9. 60 मीटर अंतरानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत
10. संकटकाळात बाहेर पडण्यासाठीही विविध रस्ते तयार करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

Narendra Modi | नरेंद्र मोदींचा जपानच्या नव्या पंतप्रधानांना फोन, भारतभेटीचे निमंत्रण

(Prime Minister Narendra Modi inaugurates Atal Tunnel at Rohtang)