सहाय्यता निधीच्या नावातही मोदींकडून राजकारण, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

| Updated on: Apr 01, 2020 | 5:34 PM

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोरोना पॅकेजमधून स्वतःची प्रसिद्धी केल्याचा आरोप केला आहे (Prithviraj Chavan on PM Modi and corona package).

सहाय्यता निधीच्या नावातही मोदींकडून राजकारण, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोरोना पॅकेजमधून स्वतःची प्रसिद्धी केल्याचा आरोप केला आहे (Prithviraj Chavan on PM Modi and corona package). मोदींनी कोरोना पॅकेजला स्वतःचं नाव देऊन स्वतःचं प्रमोशन केलं. यातही त्यांनी प्रमोशनची संधी सोडली नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात कोरोनासाठी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करताना त्याला राष्ट्रपतीचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे किंवा ट्रम्प यांचे पॅकेज असल्याचं म्हटलं नाही. मात्र, भारतात कोरोनासाठीचं आर्थिक पॅकेज पीएम गरीब कल्याण पॅकेज आहे.”


पंतप्रधान मोदींनी या आधी स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीऐवजी (पीएम नॅशनल रिलिफ फंड) नवा पीएम केअर फंड सुरु करण्याच्या निर्णयावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीची स्थापना जानेवारी 1948 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी केली. त्यानंतर आजपर्यंत झालेल्या एकाही पंतप्रधानाला या निधीऐवजी नवा राष्ट्रीय निधी सुरु करण्याची गरज वाटली नाही. पण नरेंद्र मोदींनी पीएम केअर फंड सुरु करुन स्वतःच्या प्रमोशनची संधी सोडली नाही.”


दरम्यान, याआधी काँग्रेसनेही पंतप्रधान मोदींवर व्यक्तिगत प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत ट्विट करत मोदींच्या पुलवामापासून अनेक प्रसंगांवर केलेल्या कृतीवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या :

तब्बल 5 हजार जण हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये, मुंबईत 4 हजार जणांचं पथक कार्यरत : राजेश टोपे

कोरोना मोहिमेसाठी अंगणवाडी-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मानधन, 25 लाखांचा विमा : हसन मुश्रीफ

‘कोरोना’ रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर-कर्मचारी युद्धातील आघाडीचे सैनिक, राजेश टोपेंकडून पत्राद्वारे आभार

Prithviraj Chavan on PM Modi and corona package